सलमान खानच्या बहिणीचा मोडणार संसार?, आयुष शर्माने सांगितलं मोठं सत्य

अभिनेता सलमान खान अनेकदा फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम(truth) स्पेंड करत असतो. त्याची बहिण अर्पिता खानसोबतही अनेकदा फिरत असतो. अर्पिता खान आणि आयुष शर्माने २०१४ मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला यावर्षी १० वर्षे झाली आहेत. अशातच या कपलच्या लग्नाच्या १० वर्षानंतर घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे, सध्या सोशल मीडियावर भाईजानच्या बहिणीचा घटस्फोट होणार का ? अशी चर्चा होत आहे. नुकतंच अभिनेता आयुष शर्माने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटावर भाष्य केले आहे.

अर्पिता आणि आयुषच्या(truth) नात्यामध्ये काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. आयुषने सांगितले की, “मला एकदा पापाराझीने विचारलेलं की, तू अर्पितासोबत घटस्फोट घेतोय का? मी हा प्रश्न ऐकूणच हैराण झालो.

आमच्या नात्याबद्दल अनेकजण अफवा पसरवत आहेत. मी माझ्या मुलासोबत डोसा खाण्यासाठी बाहेर गेलो होतो. माझ्या आणि अर्पिताच्या घटस्फोटाच्या रंगणाऱ्या चर्चांना पाहून मी हैराण झालो होतो. पण मी आणि पत्नी अर्पिता या अफवांवर पोट धरून हसलो.”

आयुष पुढे मुलाखतीमध्ये म्हणाला, “मी घरी आल्यानंतर अर्पिताला विचारलं की, तू मला घटस्फोट देणार आहेस का? या अफवांवर आम्ही एकत्र बसून पोट धरून हसलो.” असं म्हणत आयुषने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आयुषने सांगितले की, अर्पिता मला कायमच सपोर्ट करते. ती नेहमीच माझ्या पाठीशी खंबीर उभी असते. पण असं असलं तरीही ती माझ्यावर टीका करत असते. आयुष शर्मा शेवटचा ‘रुसलान’ चित्रपटात दिसला होता.

हेही वाचा :

जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

मी गॅरंटी देतो.. सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया

काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान