‘मला लोकं सेकंड हॅण्ड म्हणत होते, वापर केलेली…’; घटस्फोटावर पहिल्यांदा बोलली समांथा रुथ प्रभू

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभून आणि नागा चैतन्य यांनी 2021 मध्ये घटस्फोट(divorce) घेतला. त्यांच्या घटस्फोट नक्की कशामुळे झाला याविषयी आजवर अनेक चर्चा रंगल्या. त्याविषयी कधीच समांथा आणि नागा चैतन्यनं काही सांगितलं नाही. पण आता समांथानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटामाागचं खरं कारण काय ते सांगितलं आहे.

समांथा यावेळी तिच्या घटस्फोटाविषयी(divorce) सोशल मीडियावर काहीही अफवा सुरु होत्या याविषयी सांगत त्यामागचं खरं कारण सांगताना दिसली. समांथानं ‘गैलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखती तिच्या घटस्फोटाचं खरं कारण सांगितलं आहे. समांथानं दुर्दैवाने, आपण पुरुषप्रधान समाजात राहतो. जिथे केव्हाही काही चूक झाली की त्यासाठी स्त्रीला दोषी ठरवण्यात येतं. मी असं म्हणतं नाही की कधीच पुरुषांना जबाबदरा ठरवलं जातं नाही, पुरुषांना ठरवलं जातं, पण त्यापेक्षा जास्त स्त्रीला सहन करावं लागतं. फक्त त्यांच्यावर होणारी टीका, आणि इतर गोष्टी नाही तर ऑनलाइन आणि खऱ्या आयुष्यात देखील त्यांच्यावर टीका करण्यात येते.

पुढे समांथा म्हणाली, ‘माझ्याविषयी ज्या गोष्टी नव्हत्या अशा अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या बोलण्यात आल्या. पण या सगळ्यात मी जर कोणत्या गोष्टीमुळे स्थिर राहिले, ती म्हणजे माझं माझ्याशी संभाषण. माझ्याविषयी अनेक खोट्या आणि चुकीच्या गोष्टी बोलल्या जात होत्या तेव्हा मी माझ्याशीच संवाद केला. त्यात अनेकवेळा असं व्हायचं की मला वाटायचं की समोर येऊन मी सांगू की हे खरं नाही, मला खरं काय आहे ते सांगू द्या.’

पुढे समांथा म्हणाली, ‘तुम्ही अशा अनेक लोकांना भेटाल जे तुमच्यावर काही मिनिटांसाठी प्रेम करतील, किंवा मग तीन दिवस. तुम्ही काही चुकीचं केलं की त्यानंतर ते पुन्हा तुमचा द्वेष करु लागतात. तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सत्य काय आहे हे माहित आहे या विचारावर तुम्ही आयुष्य जगू शकत नाही का? मुळात जर लोकांना वाटत असेल की तुमच्याविषयी असलेल्या या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, ते पण ठीक आहे. मला माझ्या पूर्ण आयुष्यात फक्त एकाच गोष्टीची अपेक्षा होती ती म्हणजे प्रेम ,प्रमाणीकरण आणि कौतुक करायचे. हे ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे मी अजून काही सांगितलेलं नाही. त्यामुळे कोणी कोणत्या गोष्टीवर विश्वास करायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे.’

घटस्फोटाविषयी बोलताना पुढे समांथा म्हणाली, ‘एक महिला जेव्हा घटस्फोटाचा सामना करते, त्यावेळी तिला खूप वाईट वागणूक दिली जाते. माझ्या विषयी काहीही बोलण्यात आलं. अनेक कमेंट करण्यात आल्या. मला लोकं सेकंड हॅन्ड म्हणत होते, वापर केलेली म्हटलं आहे. म्हणाले हिच्या आयुष्याला अर्थ नाही. तुम्हाला एका कोपऱ्यात ढकलण्यात येतं. तुम्ही स्वत: ला अपयशी समजू लागतात. तुम्हाला लाज वाटू लागते की तुम्ही आधी विवाहीत होते पण आता नाही.’

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा