संजय मंडलिक-संभाजीराजे एकमेकांसमोर, सर्वांच्या नजरा थांबल्या, पुढे जे झालं ते महाराष्ट्रानं पाहिलं

कोल्हापुरात एका कार्यक्रमात संजय मंडलिक आणि संभाजीराजे आमनेसामने आल्याचे चित्र पहायला मिळाले. आमनेसामने येताच दोन्हींच्या कार्यकर्त्यांच्या नजरा थांबल्या होत्या. आता काय बोलणार (faced)याकडे सर्वांचे लक्ष होतं. वाचा नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व मंडळी झोकून देऊन काम करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजीराजे छत्रपती आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी गावं पिंजून काढत आहेत.(faced) तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे देखील प्रत्येक गावात जात मतदारांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.

अशातच आज संभाजी राजे छत्रपती आणि संजय मंडलिक एका सुनियोजित कार्यक्रमादरम्यान एकमेकांसमोर आले. हे चित्र पाहून सर्वांच्या नजरा या दोघांवर थांबल्या होत्या. विरोधात असलेले उमेदवार आणि मुलगा एकत्र आल्याने नेमकी येथे काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र दोघेही हास्य आणि हस्तांदोलन करत काही काळ (faced)चर्चा केली आणि दोघेही मार्गस्थ झाले. कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांचे सुपुत्र संभाजी राजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक दोघेही आज राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील गोकुळचे संचालक व बिद्रीचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणास अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांसह आले होते. सुनियोजित होता मात्र वेळ वेगवेगळी होती.

हेही वाचा :

कोल्हापूर : भर रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यासमोर सशस्त्र तरुणावर हल्ला करण्यात आला

हातकणंगले मतदारसंघात चर्चेला उधाण…..

इचलकरंजी : वस्त्रनगरीत योजनांच्या आडोशाने फसवणूक…..