कोल्हापूर : भर रंकाळा चौपाटीवर नागरिकांच्या डोळ्यासमोर सशस्त्र तरुणावर हल्ला करण्यात आला

कोल्हापूर प्रतिनिधी : आपल्यातील वाद मिटवायचा आहे ,तातडीने रंकाळा टॉवर परिसरात ये… असा फोनवरून (sharp)मेसेज देऊन सराईत गुंड अजय दगडू शिंदे उर्फ रावण वय 35 राहणारी यादवनगर याला रंकाळा तलाव परिसरात बोलवून घेऊन तलवार कोयत्याने सभासप 23 वार करून खून केला. खुनानंतर संशयित हल्लेखोर पळून गेले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. जुना राजवाडा पोलिसांनी रात्री सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

यादवनगर परिसरातील गुंडांच्या दोन गटात गेल्या दोन वर्षापासून वाद सुरू आहे. इर्षा ,संघर्ष ,वर्चस्ववाद यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत असतात. पोलिसांनी त्यांच्यावर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, मात्र जेलमधून सुटून आल्यानंतर हे तरुण पुन्हा एकमेकाला चितावण्याची भाषा करतात त्यांच्यात हाणामाऱ्या नियमित सुरू असतात. या वर्चस्वादातूनच या परिसरात खुनाचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.

येथे राहणारा अजय शिंदे हा सराईत गुन्हेगार(sharp) असून त्याच्यावर 16 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला हद्दपार करण्यासाठी पोलीस पोलिसांनी प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवला आहे. अजय शिंदे व त्याच्या दुसऱ्या गटात काही दिवसापूर्वी वाद झाला होता, हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू होते. यातील एका गटाणे पुढाकार घेतला आणि गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अजयला फोन करून रंकाळा टॉवर परिसरात येण्यासाठी सांगितले.

अजय शिंदे हा त्याचा मित्र आकाश शिंदे याला घेऊन गुरुवारी सायंकाळी रंकाळा टॉवर परिसरात पोहोचला. यावेळी हातात कोयते तलवारी घेऊन सहा तरुण उभे होते. काहीतरी दगा फटका झाला आहे हे तरुण आपल्याला आज संपवणारच हे अजयच्या लक्षात आल्यानंतर तो व त्याचा मित्र आकाश तेथून पळत सुटले. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला .एका ठिकाणी गाठून तलवारीची सपासप वार केले या हल्ल्यात मान, डोके ,पाठ दंडावर वीस ते पंचवीस घाव असल्यामुळे अजय शिंदे जागीच ठार झाला. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर त्याच्यावर सपासप वार करत होते. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्या कारमधून हल्लेखोर आले होते ती कार त्याच ठिकाणी टाकून ते पळून गेले.

सायंकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी(sharp)मोठी गर्दी जमली होती. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी पोलीस ठाण्याची पथके तातडीने दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला. अजय शिंदे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती यादवनगर येथील लोकांना समजतात त्याचे नातेवाईक व मित्र यांनी सी पी आर रुग्णालय आवारात गर्दी केली होती.

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी केली त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .पोलिसांनी नातेवाईकांचे समजूत काढली. रात्री उशिरा पोलिसांनी या खून प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले.
खून झालेला सराईत गुन्हेगार अजय शिंदे हा वादग्रस्त स्टेटस ठेवत होता खुन्नस देणाऱ्या त्याच्या मोबाईल स्टेटस मुळे यादव नगर परिसरातील दुसरा गट चिडून होता त्यातूनच त्यांच्या खटके उडायचे रावण १३२७ या नावाने त्याचे इंस्टाग्राम वर अकाउंट होते .या अकाउंट वरून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणारे व्हिडिओ तो पोस्ट करत होता. रावण कधी मरता नही..
माझा पॅटर्नचा वेगळा आहे विषय गंभीर तिथे अजय शिंदे खंबीर अशा आशियाचे त्याचे व्हिडिओ असायचे.

हेही वाचा :

हातकणंगले मतदारसंघात चर्चेला उधाण…..

इचलकरंजी : वस्त्रनगरीत योजनांच्या आडोशाने फसवणूक…..

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीतही साताऱ्याला स्थान नाहीच