‘सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट…’, रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक झाल्याने खळबळ

यंदाच्या आयपीएलमध्ये रियान परागने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चांगली कामगिरी(history) केली आहे. रियानच्या दमदार फलंदाजीने राजस्थानने अनेक सामन्यांमध्ये विजय देखील मिळवला आहे. अशातच आता रियान परागचं नाव चर्चेत आलं आहे. मात्र यावेळी क्रिकेटमुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणारे रियान चर्चेत आल्याचं दिसतंय. रियान परागची युट्युब हिस्ट्री लीक झाल्याचं दिसून आलंय. यामुळे रियान पराग अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

रियान परागच्या युट्युब हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(history) आणि सारा अली खान यांची नावं दिसली. या हिस्ट्रीचे लीक झाल्याचे फोटो तसंच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतायत. पण ही गोष्ट नेमकी समोर कशी आली ते पाहूयात.

रियान पराग क्रिकेट खेळण्यासोबत एक गेमिंग चॅनल देखील चालवत असल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये तो लाइव्ह स्ट्रीमिंग करतो. या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान पराग यूट्यूबवर कॉपीराइट फ्री म्युझिक शोधत होता. त्याने सर्च बॉक्सवर क्लिक करताच त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे दिसतात आणि त्यापुढे हॉट लिहिलेलं दिसतंय. ही गोष्ट लोकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली.

दरम्यान रियान परागचं नाव काही वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही रियान त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि मैदानावरील काही आक्षेपार्ह कृतींमुळे वादात सापडला आहे. आयपीएल 2023 चा मागील सिझन परागसाठी फारसा चांगला गेला नाही. त्या सिझनमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही. परिणामी चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

मात्र गेल्या मोसमात फ्लॉप ठरलेल्या रियान परागने या सिझनमध्ये म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी केली. तो या स्पर्धेतील सर्वाधिक रन्स करणारा तिसरा खेळाडू होता. 15 सामन्यांच्या 14 डावात फलंदाजी करताना परागने 52.09 च्या सरासरीने आणि 149.22 च्या स्ट्राईक रेटने 573 रन्स केले आहे. यावेळी त्याच्या नावे 4 अर्धशतकांचांही समावेश आहे.

हेही वाचा :

‘अब तुम ही हो’ गाण्यावर भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमँटिक डान्स : Video

चक्क PM मोदी यांचा भारताच्या कोचपदासाठी अर्ज? धोनी-सचिन अन् अमित शाह यांचंही नाव

‘कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या’, रासायनिक कंपन्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय