चक्क PM मोदी यांचा भारताच्या कोचपदासाठी अर्ज? धोनी-सचिन अन् अमित शाह यांचंही नाव

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड(coach) यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतो. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरे तर ‘नरेंद्र मोदी’पासून ‘अमित शाह’, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांच्या नावाने बनावट अर्ज(coach) आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3,000 हून अधिक अर्जदार मिळाले आहेत.

अहवालानुसार, बीसीसीआयला तेंडुलकर, धोनी, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इतर माजी क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक अर्ज आले. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारख्या राजकारण्यांचीही नावे आहेत.

भारतीय मंडळांना बनावट अर्ज प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्येही जेव्हा बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. त्यावेळी अनेक सेलिब्रिटींकडून अर्ज आले होते. त्यानंतर बोर्डाने इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज पाठवण्यास सांगितले, यावेळी बीसीसीआयने Google Forms चा वापर केला.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या वर्षीही बीसीसीआयला असाच प्रतिसाद मिळाला होता जिथे फसवणूक करणाऱ्यांनी अर्ज केला होता आणि यावेळीही तीच गोष्ट झाली आहे. बीसीसीआय गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे एका शीटमध्ये अर्जदारांची नावे तपासणे सोपे आहे.”

हेही वाचा :

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा…

ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतचा पहिला व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

‘कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या’, रासायनिक कंपन्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय