‘धर्मवीर’मधील राजन विचारेंचा ‘तो’ सीन खोटा; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
‘धर्मवीर’ या चित्रपटात(film) राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेलं सर्व खोटं होतं, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. “आनंद दिघे साहेबांनी सांगूनही विचारेंनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता. राजन विचारे हे आनंद दिघेंचे नकली शिष्य आहेत. धर्मवीर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल”, असं ते म्हणाले.
‘धर्मवीर’ या चित्रपटात(film) दाखवलं गेलं होतं की, एकनाथ शिंदे यांच्या मुलांच्या निधनानंतर ते पूर्णपणे खचून जातात. दु:खाच्या सागरात बुडालेल्या शिंदेंना त्यातून बाहेर काढण्यासाठी कामात व्यग्र ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय समजून आनंद दिघे हे राजन विचारे यांना सभागृह नेतेपदाचा राजीनामा द्यायला सांगतात. तेव्हा राजन विचारे लगेच त्या पदाचा राजीनामा देतात. मात्र चित्रपटात दाखवलेलं हे सर्व खोटं असल्याचा खुलासा आता शिंदेंनी केला आहे.
“चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता. तो रघुनाथ मोरेंकडे गेला आणि म्हणाला, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेतायत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल.
हा निर्णय विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिलकुल इथे तिथे काही बोलू नकोस. पण तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं की असं करू नका. तेव्हा साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्या भाषेत आनंदाश्रमामधील आतल्या खोलीमध्ये समजावलं. हे करायला लागलं. आम्ही सिनेमात जे दाखवलं ते एवढं उलटं आणि एकदम चांगलं दाखवलं. पण तो चांगला नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राजन ठाकरे यांना ठाकरे गटाने ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडात राजन विचारे यांनी त्यांना साथ दिली नाही. ते उद्धव ठाकरे गटातच राहिले.
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीत बाजी मारल्यास कंगना करणार….?
NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा
ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी CM शिंदेची मोठी खेळी