टी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला,’या’ खेळाडूची जागा पक्की

टी20 वर्ल्ड कपसाठी येत्या चार ते पाच दिवसात भारतीय क्रिकेट(cricket) संघाची घोषणा होईल. आयपीएलमधल्या कामगिरीवर टी20 वर्ल्ड कपसाठी निवड केली जाणार असून बीसीसीआय निवड समिती खेळाडूंवर लक्ष ठेऊन आहे. कोणत्या खेळाडूंची खेळाडूंची संघात निवड होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सर्वात जास्त चुरस आहेत विकेटकिपरच्या जागेसाठी. आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी विकेटकिपरसाठी अनेक नावांची चर्चा होती. यात दिनेश कार्तिक, केएल राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, ईशान किशन या खेळाडूंचं नाव आघाडीवर होतं. पण यातला खेळाडूने टीम इंडियात आपली जागा पक्की केली आहे.

तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं असंच काहीसं म्हणावं लागले विकेटकिपर-फलंदाज(cricket) ऋषभ पंतबाबत. 22 मार्चला म्हणजे आयपपीएल सुरु होण्यापूर्वी कोणी विचारही केला नसेल की ऋषभ पंत पुन्हा मैदानावर परतेल. कार अपघातानंतर तब्बल 14 महिन्यांनी ऋषभ पंत मैदानावर परतणार होता. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याकडे निवड समितीसह करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. पंत आयपीएलपर्यंत पूर्णपणे तंदरुस्त होईल का? तंदरुस्त झालाच तर तो फलंदाजी आणि विकेटकिपिंग करु शकणार का? टी20 वर्ल्ड कपसाठी आपला दावा सांगणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

ऋषभ पंतने आयपीएलमध्ये केवळ पुनरामगमन केलं नाही तर दमदार कामगिरी करत सर्वांची तोंडही बंद केलीत. कर्णधार, विकेटकिपर आणि फलंदाज अशा तीन आघाड्या ऋषभ पंत सांभाळतोय. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 9 सामने खेळलेत, यात दिल्लीतर्फे दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋषभ पंतचा समावेश आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातील खेळीने ऋषभ पंतने केवळ संघाला जिंकूनच दिलं नाही तर टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात आपला दावाही ठोकला आहे. या सामन्यात पंतने अवघ्या 43 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या.

पंतची दुसरी सर्वात मोठी जमेची बाज म्हणजे विकेटकिपिंग. आयपीएलपूर्वी पंतच्या विकेटकिपिंगवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अपघातात पंतच्या पाय आणि गुडघ्यांना मार बसला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये पंत स्टम्पच्या मागे त्याच चपळाईने विकेटकिपिंग करु शकतो का याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पण आतापर्यंत झालेल्या सामन्यात पंतने त्याच चपळाईने आणि त्याच जोशाने विकेटकिंपिंग केलीय. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंतने स्टम्पमागे दोन अप्रतिम झेल टिपले. याआधीच्या सामन्यातही पंतने आपल्या विकेटकिपिंगचे नमुने दाखवलेत.

25 वर्षांच्या ऋषभ पंतच्या(cricket) आयपीएलमधल्या कामगिरीबाबत बोलायचं झालं तरी गेल्या तीन हंगामापेक्षा चौथ्या हंगामात त्याने जास्त धावा केल्या आहेत. आयपीएल 2020 मध्ये पंतने 14 सामन्यात 343 धावा केल्या होत्या तर आयपीएल 2021 मध्ये त्याने 419 आणि 2022 च्या हंगामात 340 धावा केल्या. या तुलनेत पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 42 धावा केल्या आहेत. गेल्या तीन हंगामापेक्षा ही कामगिरी चांगली आहे.

ऋषभ पंतचा सामना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसमनशी आहे. यंदाच्या हंगामात सॅमसनही दमदारी करतोय संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. तर पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये पंतची जागा पक्की आहे, दुसरा विकेटकिपर म्हणून सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

27 वर्षांनंतर करिष्मा-माधुरीमध्ये रंगली डान्सची जुगलबंदी

कोकणात येऊन बोलून दाखवा, मग परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो!

‘कॉमन मॅन’साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट