मी बाप होणार होतो आणि…’ लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?

सध्या आयपीएल सुरु असून रोहित शर्माचं (rohit sharama)नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून वगळल्यानंतर रोहित शर्माच्या सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगू लागल्यात. दरम्यान एखाद्या क्रिकेटरला सामना खेळण्यासाठी अनेकदा विविध देशांमध्ये प्रवास करावा लागतो. अनेक वेळा ते परदेशात जाऊन एक-दोन महिने सिरीज खेळतात. अशा परिस्थितीत क्रिकेट आणि कुटुंब यांच्यात समतोल राखणं फार कठीण होऊन बसते. नुकतंच यावर रोहित शर्माने भाष्य केलं आहे.

खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे अनेकवेळा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे (rohit sharama)क्षण चुकवतात. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयुष्यातील अशाच एका भावनिक क्षणाबद्दल सांगितलंय. जो क्षण त्याचे चुकवला होता. अलीकडेच एका पॉडकास्टवर खुलासा केला की, तो ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असल्यामुळे आपल्या मुलीचा जन्माच्या वेळी उपस्थित राहू शकला नव्हता.

पहिल्यांदाच बाप होणं हा माणसाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. 2020 मध्ये ज्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होती तेव्हा विराट कोहली पहिल्यांदाच बार होणार होता. त्यावेळी तो मुलीच्या जन्मासाठी पहिल्या टेस्टनंतर भारतात परतला. अलीकडेच इंग्लंड टेस्ट सिरीजदरम्यानही कोहलीने मुलाच्या जन्मासाठी सुट्टी घेतली होती. पण रोहित शर्माला आपल्या मुलीचा जन्माच्या वेळी उपस्थित राहून आनंद घेता येऊ शकला नव्हता. क्लब प्रेरी फायर पॉडकास्टवर रोहितने 2018-19 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची कहाणी सांगितली.

रोहित शर्माने खुलासा केला की, 2018 मध्ये मी पहिल्यांदा बाप होणार होतो आणि मेलबर्न टेस्टनंतर तो आपल्या मुलीच्या जन्मासाठी भारतात येणार होता पण तसं होऊ शकले नाही. रोहितला त्यावेळी बोर्डाकडून सुट्टी मिळाली असली तरी ऑस्ट्रेलियाने त्याच्याकडून हा आनंद हिरावून घेतला होता. भारत मजबूत स्थितीत होता आणि त्यांना विजयासाठी फक्त दोन विकेट्सची गरज होती. त्यानंतर पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्यात 100 हून अधिक रन्सची पार्टनरशिप झाली. जरी भारताने सामना जिंकला असला तरी तो खूप निराश झाला कारण त्याला त्याचं फ्लाइट पकडण्यास उशीर झाला आणि त्याच्या कुटुंबासाठी वेळेवर पोहोचता आलं नाही.

रोहित शर्माप्रमाणेच टीम इंडियाचा माजी खेळाडू महेंद्रसिंग धोनीलाही आपल्या मुलीचा जन्म पाहता आला नव्हता. 2015 च्या वर्ल्डकपचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी धोनी पहिल्यांदाच पिता बनणार होता, पण त्याने आपल्या मुलीच्या जन्मापूर्वी देशाला प्राधान्य दिलं आणि तो टीमसोबतच राहिला. पत्रकार परिषदेत त्याला याबाबत विचारलं असता त्याने सांगितलं होतं की, मी नॅशनल ड्यूटीवर आहे, त्यामुळे मुलीला भेटण्यासाठी भारतात जाऊ शकत नाही.

हेही वाचा :

ITR कडून करदात्यांना दिलासा! पॅन-आधार लिंक केले नसेल तर… 

अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

लाईट बिल जास्त… महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार