सेक्स टेप प्रकरण 100 कोटींची ऑफर रेवन्ना प्रकरणात काँग्रेसच्या मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप
प्रज्वल रेवन्ना प्रकरणात आता एक नवीन धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाला आता(deal) नवीन वळण मिळणार आहे. प्रज्वल रेवन्नावर त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या महिलांच लैंगिक शोषण, छळ, अत्याचार केल्याचे आरोप आहेत.जेडीएसने प्रज्वलला पार्टीतून निलंबित केलं आहे.
प्रज्वल रेवन्ना सेक्स टेप प्रकरणात एक नवीन धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रज्वल रेवन्नावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांच लैंगिक शोषण, छळ, अत्याचार केल्याचे आरोप आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रज्वल रेवन्नाचे हे अश्लील वर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओंनी फक्त कर्नाटकच्याच नाही, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रपधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि खासदार आहे. आता या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे. प्रज्वल रेवन्ना सेक्स टेप प्रकरणात भाजपाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. रेवन्नाचे अश्लील व्हिडिओ असलेल्या पेन ड्राइव्हचा प्रसार करण्यात डीके शिवकुमारशिवाय अन्य (deal)चार मंत्री सुद्धा सहभागी होते, असा आरोप भाजपा नेते देवराजे गौडाने केला आहे.
शिवकुमारने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी आणि एचडी. कुमारस्वामी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मला 100 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती, असं देवराजे गौडाने म्हटलं आहे. देवराजे गौडाला लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे. देवराजे गौडाची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यानंतर त्याला जिल्हा तुरुंगात नेण्यात आलं. या दरम्यान मीडियाशी बोलताना देवराजे गौडाने मोठा दावा केला. पेन ड्राइव्ह प्रकरणात डी.के. शिवकुमारचा हात आहे, असा आरोप देवराजे गौडाने केला.
हा विषय हाताळण्यासाठी चालुवरायास्वामी, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खरगे (deal)आणि एक अन्य मंत्री अशी चार जणांची टीम बनवण्यात आली होती. भाजपा, पीएम मोदी आणि कुमारस्वामी यांना बदनाम करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं. मला 100 कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते असा दावा देवराजे गौडाने केला.
प्रज्वल रेवन्ना कुठे आहे?
प्रज्वल रेवन्ना माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू असून हासनमधून खासदार आहे. महिलांच लैंगिक शोषण केल्याचे त्याच्यावर अनेक आरोप आहेत. सध्या तो देशाबाहेर फरार आहे. त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. रेवन्नाशी संबंधित आपत्तीजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर जेडीएसने प्रज्वलला पार्टीतून निलंबित केलं.
मतदान कधी झालेलं?
रेवन्नावर बलात्कार, लैंगिक शोषणासह अनेक गुन्हे आहेत. प्रकरण समोर येताच रेवन्ना 27 एप्रिलला जर्मनीला पळून गेला. प्रज्वल विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली आहे. तो हासन लोकसभा मतदारसंघातून भाजपा-जद(एस) आघाडीचा संयुक्त उमेदवार होता. या लोकसभा जागेसाठी 26 एप्रिलला मतदान झालं.
हेही वाचा :
मालदीवचे पुन्हा एकदा भारताच्या विरोधात वक्तव्य..
लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली Video
कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर…