लालू प्रसाद यांच्या मुलाने आपल्याच कार्यकर्त्याला स्टेजवरुन ढकललं खाली Video

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव(stage) यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. राजकीय व्यासपीठावर व्यक्त केलेल्या रागामुळे ते अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येतात. तेज प्रताप यादव यांची मोठी बहीण मीसा भारती यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आयोजित बैठकीत सोमवारी तेज प्रताप यांनी असे काही केले ज्यामुळे यादव कुटुंबाला आणि पक्षाला मोठी मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. तेज प्रताप यादव यांची त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याला मंचावरून खाली ढकलून दिले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वृत्तानुसार, तेज प्रताप यादव यांची मोठी बहीण आणि पाटलीपुत्र लोकसभा(stage) मतदारसंघातील आरजेडी उमेदवार मीसा भारती यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवीही उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पाटणा येथील श्रीकृष्ण मेमोरिअल हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. मीसा भारती, राबडी देवी आणि तेज प्रताप यादव यांच्यासह पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते मंचावर उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्टेजवर गर्दी असल्याने उभे राहण्यासाठी जागा कमी होती.

त्यामुळे यावेळी तेजप्रताप यादव एका कार्यकर्त्यावर चिडले. त्यांनी कार्यकर्त्यांवर हात देखील उचलल्याचे दिसून आले. मीसा भारती तेज प्रतापला शांत करण्याचा खूप प्रयत्न करताना दिसल्या. रागाच्या भरात तेज प्रतापने कार्यकर्त्याला थेट मंचावरून ढकलले. दरम्यान, त्यांची आई राबडी देवी आणि बहीण मिसा भारती मंचावर आल्या. दोघांनीही लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यानंतर मीसा भारती आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तेज प्रताप यादव यांना शांत केले.

माजी मंत्री तेज प्रताप यादव यांची मंचावर असलेल्या समर्थकाशी हाणामारी झाली आणि त्यांना धक्काबुक्की केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचवेळी तेज प्रताप यादव यांनी ‘एक्स’वर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्या हाताला आधीच दुखापत झाल्याचे त्याने सांगितले.

तेज प्रताप यादव यांनी या घटनेबाबत सोशल मिडीया X वर लिहिले की, ‘जे लोक माझा एक व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, नाण्याच्या दोन बाजू आहेत, एका बाजूला तुम्ही सर्वांनी ते पाहिले, तर दुसरीकडे काय झाले की उमेदवार मीसा भारती आणि माझी आई एकत्र होते आणि मी त्यांच्यात जोरजोरात धक्के देत होतो. माझ्या हाताला आधीच दुखापत झाली आहे आणि जेव्हा मला तो पुढे ढकलताना असहाय्य वेदना जाणवू लागल्या, तेव्हा मला स्वतःला वाचवण्यासाठी अचानक त्याला बाजूला करणे भाग पडले. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. माझ्यासाठी जनता सर्वोच्च आहे, जनतेचा आदर हे आपले कर्तव्य आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी…

जान्हवी कपूरला आवडतो उर्फी जावेदचा फॅशन सेन्स…

‘I love You’ नाही तर, असं करा आवडत्या व्यक्तीला प्रपोज, उत्तर ‘हो’च असेल