अभिनेत्रीचा लैंगिक छळ; चित्रपट दिग्दर्शकाला अटक

लग्नाचे आश्वासन देऊन २६ वर्षीय अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार (harassment)केल्याप्रकरणी एका दिग्दर्शकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

अभिजीत असे आरोपी दिग्दर्शकाचे नाव असून न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी मूळची जम्मूची असून सध्या गोरेगाव परिसरात राहते. तिने विविध नाटके आणि लघुपटांमध्ये अभिनय केला आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये बिहारमध्ये एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करत असताना, तिची आरोपी अभिजीतशी गाठ पडली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले. पीडितेने आरोप केला आहे की, १७ मे ते १३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत त्याने तिच्या आक्षेपाला न जुमानता तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार (harassment)केले.

नंतर दुसऱ्या शॉर्ट फिल्म प्रोजेक्टसाठी दिल्लीत असताना आणि राहण्याची सोय नसताना, अभिजीतने तिची त्याच्या एका नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था केली. त्या वेळी त्याने तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून वैयक्तिक माहितीसह महत्त्वपूर्ण डेटा चोरला. पुढे तो डेटा सोशल मीडियावर प्रसारित करण्याच्या धमकीने तिला लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

यानंतर पीडितेने लग्नाचा विषय काढला असता अभिजीतने नकार देत टाळाटाळ केली. विश्वासघाताने व्यथित होऊन तरुणी आपल्या जम्मूमधील घरी परतली. घरी परतल्यावर तरुणीने घडलेला प्रसंग तिच्या आई आणि भावाला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांना सोबत घेत तरुणीने ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी दिग्दर्शकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याप्रकरणी कांदिवली पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

सांगलीत नामांकीत उषःकाल हॉस्पिटलकडे 25 लाखांच्या खंडणीची मागणी? 3 जणांवर गुन्हा दाखल

प्रियांका सांगणार वाघिणीची गोष्ट; देसी गर्लनं ‘टायगर’ ची रिलीज डेट केली जाहीर

  हेमंत पाटील, धैर्यशील मानेंसह शिंदेंच्या पाच जागा धोक्यात?