शरद पवारांची ताकद वाढली, भाजपला खिंडार पडणार

ऐन लोकसभा २०२४ निवडणूक तोंडावर असताना पश्चिम महाराष्ट्रात(strength training) भाजपला मोठा धक्का बसला. अकलुजचे भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्राथामिक सदस्याचा राजीनामा दिला. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जातंय.

धैर्यशील मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रातील(strength training) भाजपचे तगडे नेते होते. त्यांची अकलुजमध्ये मोठी ताकद आहे. त्यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. कारण, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राजीनाम्यानंतर आता बाळ दादा मोहिते पाटील देखील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

आम्हाला ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची भीती वाटतं नाही. १४ एप्रिल रोजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील वगळून संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबं जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत, असं बाळ दादा मोहिते पाटील यांनी सांगितलं आहे.

लवकरच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत, असल्याचं बाळ मोहिते म्हणाले आहेत. त्याचबरोबर फलटणचे संजीव राजे नाईक निंबाळकर ते आमच्यासोबत येणार नाहीत, असंही बाळ मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांनी देखील मोहिते पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाला पाठींबा दिला आहे. माळशिरस तालुक्यातून सुमारे १ लाख 40 हजार मताधिक्य मिळेल, असा विश्वास जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटील पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. मी असं ऐकलंय की, त्यांना हातात तुतारी घ्यायची इच्छा आहे. पण माझा एवढा संपर्क झालेला नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

मिस्ट्री गर्लने शेअर केला आर्यन खानसोबत फोटो? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा

तब्बल 20 वर्षांनंतर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण

“जम्मू-काश्मीरला मिळणार संपूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच विधानसभा निवडणुका” पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा