काँग्रेसला आणखी एक धक्का; बडा नेता भाजपच्या वाटेवर

राजापूरमधून काँग्रेसला(congress) आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हाती कमळ घेणार अशी महिती समोर आलीये. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करतील.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १५ एप्रिलला प्रकाश मांडवगण काँग्रेसला(congress) रामराम ठोकणार असून भाजपमध्ये ते प्रवेश करणार आहेत. प्रकाश मांडवकर कुणबी सहकारी पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. राजापूर तालुक्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं मांडवकर यांनी स्वत: स्पष्ट केलंय.

राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असताना मांडवकरांच्या या निर्णयाचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो. गेली ३२ वर्षे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुकयाच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रकाश मांडवकर अग्रेसर राहिले आहेत.

माजी मंत्री आणि कुणबी समाजाचे दिवंगत नेते भाईसाहेब हातणकर यांचे मांडवकर हे खंदे समर्थक राहिलेत. काही काळ मांडवकरांनी भाईसाहेब यांचे स्वीय सहाययक म्हणुनही काम पाहिले होते. आपल्या तालुक्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून धडाडीचे कार्यकर्ते अशी प्रतिमा निर्माण केली. आता देखील तालुक्याच्या विकासासाठीच आपण भाजपमध्ये जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

कहरच! बाजारात विक्रीला आणलेले गाजर पायाने धुतले

कोल्हेंचा डबल धमाका; सकाळी पाचुंदकरांची घरवापसी, संध्याकाळी देशमुखांचा प्रवेश

किंग खान अन् भाईजानची झलक पाहण्यासाठी अलोट गर्दी, चाहत्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज, Video Viral