पुण्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये शरद पवारांचा जलवा…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाढाव(political news) करण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील पहिल्या काही फेऱ्यांमध्ये शरद पवारांचा प्रभाव दिसत असून शिरूर ,बारामती मध्ये शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये(political news) मतमोजणी सुरू असून कोणत्या राष्ट्रवादी पक्षाची याच्यामध्ये सरशी होणार हे मतमोजणी नंतर समोर येईल. मात्र पहिल्या काही फेऱ्यांमध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हे आघाडी घेताना दिसत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.

या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी प्रतिष्ठेची तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. अजित पवार यांनी शिरूर आणि बारामती जिकंण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती.

मात्र यामध्ये प्राथमिक कला मध्ये कुठेतरी शरद पवारांचा प्रभाव दिसत असून महायुतीचे उमेदवार कुठेतरी मागे पडत असताना दिसत आहेत. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये हे चित्र असलं तरी अद्याप खूप सार्‍या फेऱ्या बाकी असून या निवडणुकीत अत्यंत अटीतटीची झाली असल्याने शेवटच्या फेरी पर्यंत कोणाचा विजय होणार हे पाहण्यासाठी थकबावे लागणार आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरमध्ये कारने चौघांना चेंडूसारखं हवेत उडवलं! 3 ठार Video

6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

लोकसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत कोल्हापुरात ‘सतेज’ करिश्मा