अरविंद केजरीवाल यांना धक्का! ७५ हजारांचा ठोठावला दंड

कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(fine face) यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना ७५ हजारांचा दंडही ठोठावला.

याबाबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(fine face) यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना असाधारण जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या सुनावणीदरम्यान, तुम्हाला व्हेटो पॉवर कसा मिळतो? तुम्ही संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहात का? असा सवाल न्यायालयाने याचिका कर्त्यांना विचारला. तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या आधारेच अरविंद केजरीवाल न्यायालयीन कोठडीत असल्याचेही यावेळी कोर्टाने म्हटले आहे.

यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने बाजू मांडताना, मी येथे अरविंद केजरीवालांसाठी नाही तर दिल्लीच्या करोडो जनतेसाठी आलो आहे. मी येथे फक्त नागरिकांच्या हितासाठी आलो आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांच्या अटकेमुळे संपूर्ण सरकार ठप्प झाले आहे. औषधे देण्यासाठी सही करायलाही मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत. केजरीवाल यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, असा युक्तीवाद केला.

हेही वाचा :

राखी सावंत हिला होणार अटक? कोर्टात घेतली धाव, ते प्रकरण..

दारुपार्टीत वाद; रागाच्या भरात व्यावसायिकाच्या मुलाला 5 स्टार हॉटेलच्या टेरेसवरून फेकलं : video

…अन् धोनीने ड्रेसिंग रुममध्येच हेल्मेट फेकून दिलं; CSK च्या माजी खेळाडूने सांगितली ती घटना, ‘मी त्याला…’