धक्कादायक! ४७ वर्षीय गायिकेचा मृत्यू; घरात आढळला मृतदेह

आपल्या गाण्यांच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध झालेली गायिका मंडिसाचा मृत्यू झाला (death)आहे. मंडिसा अमेरिकन आयडॉल सीझन ५ मुळे आणि ग्रॅमी पुरस्काराने जगभरात प्रसिद्ध झाली आहे. मंडिसाच्या निधनाने चाहत्यांसोबत तिच्या परिवारावर आणि मित्रमंडळींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंडिसाच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या निधनाची दु:खद बातमी देण्यात आली आहे. ४७ वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

मंडिसाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर(death) करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “आम्ही तुम्हाला माहिती देतो की, काल मंडिसा तिच्या घरी मृतावस्थेत सापडली होती. आम्हाला तिच्या मृत्यूचे कारण माहित नाही. या कठीण काळात तिच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या मित्र मंडळासाठी तुम्ही प्रार्थना करावी, अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. मंडिसा ही जगभरातील आव्हानांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी प्रोत्साहन आणि सत्याचा आवाज होती.” अभिनेत्रीची ही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर होताच चाहत्यांसह तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. नेमकं अभिनेत्रीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं ?, याबद्दलचा खुलासा सध्या पोलिस करीत आहे.

मंडिसा लिन हंडली असं मंडिसाचं नाव आहे. तिने २००६ मध्ये अमेरिकन आयडॉल सीझन ५मध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे मंडिसाला जगभरात लोकप्रियता मिळाली. अमेरिकन आयडॉल नंतर, २००७ मध्ये मंडिसाचा ट्रू ब्युटी नावाचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला. मंडिसाला सर्वोत्कृष्ट समकालीन ख्रिश्चन म्युझिक अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिला ओव्हरकॉमर अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला होता. मंडिसाचे ‘फ्रीडम’, ‘इट्स ख्रिसमस’, ‘व्हॉट इफ वुई रीअल,’ ‘आउट ऑफ द डार्क’ आणि ‘ओव्हरकमर’ सह अनेक अल्बम रिलीज झालेले आहेत.

हेही वाचा :

‘कुटुंबातले लोक कामं सोडून राजकारणात सक्रिय झालेत’; अजित पवारांची शरद पवारांवर घणाघाती टीका

राज्यात समाजवादी पक्षाला मोठा धक्का, रईस शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी; अजित पवार गटात करणार प्रवेश?

देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान