लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा सलमान खानला धमकी? कॅब बुकिंग करून अभिनेत्याच्या..

सलमान खानच्या(actor) गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर १४ एप्रिलला गोळीबार झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ३ संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आता पुन्हा एकदा सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला धमकी दिली आहे. आज एका व्यक्तीने सलमान खानच्या घरी कॅब पाठवली होती. ही कॅब लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बुक करुन गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पाठवली होती.

ही कार गॅलेक्सी(actor) अपार्टमेंटजवळ थांबली. कॅब ड्रायव्हरने तिथे उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कॅब बुक केल्याचे सांगितले. या कॅबची बुकिंग सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट ते वांद्रे पोलिस स्टेशनपर्यंत करण्यात आली होती.

सिक्युरिटी गार्डने लॉरेन्स बिश्नोईचे नाव ऐकताच या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी चालकाची चौकशी केली. त्याच्याकडून माहिती घेतली. या प्रकरणी कॅब बुक करणारा व्यक्ती गाझियाबादचा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने कार बुक करणाऱ्या आरोपीचे नाव रोहित त्यागी (२०) आहे. याप्रकरणी पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

दरम्यान, सलमान खान आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. गोळीबार प्रकरणानंतर सलमान पहिल्यांदाच घराबाहेर पडला आहे. सलमान खान येणार असल्याने विमानतळावर कडेकोड बंदोबस्त करण्यात आला होता. सलमान खानचे विमानतळावरीली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार

फडणवीस, पवारांना भेटलेले जानकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार की स्वतंत्र अस्तित्व ठेवणार?

पेट्रोल ५० दिवसात स्वस्त करणार होते, दीडपट वाढवले, लोकांनो पाकीटमार शोधा : शरद पवार