250 रुपयांत SIP योजना, गुंतवणूकदारांना मोठी संधी

अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘एसबीआय म्युच्युअल फंडा’ने नवीन एसआयपी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत गुंतवणूकदारांना(investors) दरमहा केवळ 250 रुपये गुंतवणूक करता येणार आहे. अल्प उत्पन्न गटातील लोकांनाही भांडवल बाजारात सहभाग घेता यावा, हा या योजनेचा उद्देश असल्याचे एसबीआय म्युच्युअल फंडाने स्पष्ट केले आहे.

‘एसबीआय म्युच्युअल फंड जननिवेश एसआयपी योजना’ ही विशेष योजना लहान गुंतवणूकदारांना(investors) भांडवल बाजारात सहभागी होण्यासाठी सक्षम करणार आहे. या योजनेचे उद्घाटन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या हस्ते करण्यात आले.

एसबीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नंद किशोर यांनी सांगितले की, “प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरेल. तसेच असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही परवडणारी ही योजना आहे. 250 रुपये इतक्या कमी रकमेच्या एसआयपीमुळे गुंतवणुकीकडे अधिकाधिक लोक वळतील.”

आत्तापर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी किमान 500 रुपये आवश्यक होते. मात्र, या नव्या योजनेमुळे गुंतवणुकीची किमान मर्यादा आणखी कमी झाली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने एफएमसीजी कंपन्यांच्या संकल्पनेवर आधारित 250 रुपयांच्या एसआयपी योजनेची रचना केली आहे. भविष्यात दरमहा 100 रुपये एसआयपी योजना देखील आणण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Box Office वर ‘छावा’ची गर्जना; लवकरच 200 Cr क्लबमध्ये….

महावितरणाच्या नवीन नियमावलीमुळे घरगुती वीजग्राहकांना ‘शॉक’!

घरीच बनवा वर्षानुवर्षे टिकणारं भरलेलं तिखट मिरचीचं लोणचं