कोचिंग सेंटरमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार

कोचिंग सेंटरमधील शिक्षकाने विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं.

कोचिंग सेंटरमधील शिक्षकाने  विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार  करत गुरु-शिष्याच्या (coaching center)नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गुरुने आपल्याच शिष्याशी असं घृणास्पद कृत्य केलं आहे. इतकंच नाही तर आरोपी शिक्षकाने घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ काढून तरुणीला ब्लॅकमेल करत मागील दीड वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले. शिक्षकाने कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची ही घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. ही घटना परिहार पोलीस ठाणे क्षेत्रातील आवारात घडली आहे. 

नेमकं काय घडलं?

आरोपी शिक्षकाने आधी विद्यार्थिनीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि नंतर(coaching center)त्या विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाने तरुणीला व्हिडीओ दाखवत तिचं लैंगिक शोषण केलं. आरोपी शिक्षक तरुणीला मागील दीड वर्षांपासून व्हिडीओ दाखवत ब्लॅकमेल करत होता. शिक्षकाने वारंवार लैंगिक संबंधांसाठी तिला धमकावलं. यादरम्यान, तरुणीने लग्न करण्याची मागणी केल्यावर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणीच्या आईने दोघांना आक्षेपार्ह स्थिती पकडल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.

प्रकरण उघडकीस कसं आलं?

एक दिवस तरुणी कोचिंगला गेली, मात्र खूप उशीर झाला तरी परत घरी (coaching center)आली नव्हती. यानंतर पीडितेची आई थेट कोचिंग सेंटरमध्ये पोहोचली. जिथे तिने दोघांनी आक्षेपार्ह स्थिती पकडलं. समोरील दृश्य पाहताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेच्या आईने आधी काही दिवस बदनामीच्या भीतीने घटनेची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला.

परिहार येथील बडा गावातील रहिवासी शिक्षक राजेश कुमार या घटनेतील मुख्य आरोपी आहे. आरोपी शिक्षक राजेशने गावात कोचिंग उघडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी जानेवारी 2022 पासून या कोचिंगमध्ये शिकण्यासाठी जात होती. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांकडून प्रकरण दाबण्यासाठी दोन लाख रुपयांची ऑफर

30 एप्रिल 2024 रोजी विद्यार्थिनीला परतायला उशीर झाला तेव्हा तिची आई कोचिंग सेंटरमध्ये पोहोचली. यावेळी तिला दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. शिक्षकाला झापलल्यानंतर महिला आपल्या मुलीला घेऊन घरी पोहोचली. चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने 10 सप्टेंबर 2022 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत आरोपीने तिच्यावर 70 वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं. विद्यार्थ्याच्या आईने एफआयआरमध्ये पोलिसांना सांगितलं आहे की, शिक्षक राजेश कुमार तिच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अनैतिक कृत्य करत होता. तक्रार करण्यासाठी ती शिक्षिकेच्या घरी पोहोचली तेव्हा राजेश, त्याची आई तेत्री देवी आणि वडील रामश्रेष्ठ ठाकूर यांच्यासह आरोपीने प्रकरण दडपण्यासाठी तिघांनीही दोन लाख रुपयांची ऑफरही दिली. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता त्यांना मारहाणही करण्यात आली.

हेही वाचा :

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्

नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

कार्ड स्क्रॅच केलं अन् गमावले 18 लाख रुपये, लिफाफ्याच्या जाळ्यात अडकली महिला;