सुनीता विल्यम्स अंतराळात मोठ्या संकटातून बचावल्या धक्कादायक घटना उघड
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे (space)जून महिन्यापासून अंतराळात आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते इतर साथीदारांसह अंतराळात अडकले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनीता आणि बुच हे अंतराळात गेले होते मात्र आता ते थेट पुढल्या वर्षी, फेब्रुवारी महिन्यात पृथ्वीवर परत येऊ शकतात. अंतराळाशी निगडीत महत्वपूर्ण अभ्यास सुनिता विल्यम्स सध्या करत असून त्या स्पेस स्टेशनच्या कमांडरही आहेत. मात्र, नुकताच या अंतराळवीरांचे जीव दोनदा धोक्यात आले होते.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS साठी अलीकडेच अवकाशातील राडारोड्याच्या ढिगाऱ्याशी टक्कर होण्याचा धोका वाढला होता. हा राडारोडा स्पेस स्टेशनच्या दिशेने वेगाने सरकत होता, त्यामुळे सुनीता आणि तिच्या साथीदारांचा जीव धोक्यात आला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा धोका केवळ एकदा नव्हे तर दोनवेळा समोर आला होता. विशेष गोष्ट म्हणजे रशियाच्या प्रोग्रेस 89 कार्गो क्राफ्टने वेळेतच आपलं इंजिन सुरू केल्याने स्पेस स्टेशन जागेवरून हलवून (त्याला) उंचावर नेता आलं. आणि त्यामुळे त्या ढिगाऱ्याशी टक्कर होता होता वाचली.
सुरक्षेसाठी रशियाचं मोठं पाऊल
राडारोड्याच्या या ढिगाऱ्याशी टक्कर होऊ नये म्हणून रशियाने हे संपूर्ण स्पेस स्टेशन वर उचलण्याच्या निर्णय घेतला. सोमवारी 25 नोव्हेंबर प्रोग्रेस 89 कार्गो क्राफ्टने सकाळी साडेतीन मिनिटांसाठी आपलं इंजिन सुरू केलं आणि त्यानंतर हे स्पेस स्टेशन वर नेण्यात आलं, ज्यामुळे ढिगाऱ्याशी टक्कर झाली नाही (space)आणि मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे यापूर्वी, 19 नोव्हेंबर रोजी देखील असाच एक प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा राडारोड्याच्या ढिगाऱ्याशी होणारी टक्कर टाळण्यासाठी स्पेस स्टेशन 5 मिनिटांपर्यंत वर नेण्यात आलं होतं. यामुळे सर्वच अंतराळवीरांचा जीव वाचला.
अंतराळवीरांचा जीव धोक्यात
अंतराळात राडारोड्याचं प्रमाण अधिक असून ते धोकादायक आहे. पृथ्वीच्या कक्षेतच या राडारोड्यातील 40,500 वस्तू 4 इंचाहून अधिक रुंद आहेत. 1.1 दशलक्ष तुकडे आणि सुमारे 130 दशलक्ष लहान तुकडे देखील आहेत. मात्र या राडारोड्याचा वेग एवढा वेगवान आहे की ते सॅटेलाईट्स आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला धडकून धोकादायक ठरू शकतात. याप्रकारच्या राडारोड्याशी टक्कर होण्याीच शक्यता असल्याने अंतराळवीरांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
अंतराळात सुरक्षेचे उपाय
अंतराळातील राडारोड्याचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु ते एक मोठे आव्हान आहे. या राडारोड्यापासून अंतराळ स्थानकाचे संरक्षण करण्यासाठी (space)नासा आणि रशियातील अवकाश संस्था वेळोवेळी उपाययोजना करत असतात. सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीर अंतराळात त्यांचं काम सातत्याने करत आहेत, पण अशा धोक्यांमुळे त्यांना आणखी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
हेही वाचा :
आधी लाडक्या बहिणींना पैशांची ओवाळणी दिली, आता सत्तेत वाटा देणार
चाहत पांडेसोबत रजत दलालचा रोमँटिक डान्स, चाहते थक्क Video
शिंदे नको-नको म्हणतायत, पण भाजपला त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद का द्यायचंय