सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, अभिनेत्याचे जुने चॅट व्हायरल
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं(death). अभिनेत्याच्या निधानंतर सर्वत्र तुफान खळबळ माजली होती. बॉलिवूड आणि सोशल मीडियावर देखील खळबळ माजली होती. अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. पण तरी देखील अद्याप अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण समोर आलं नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीत सुशांत याची बहीण श्वेता यांनी सुशांत याच्या खोलीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. आता अभिनेत्याचे चॅट समोर आले आहेत.
सुशांत याची बहीण म्हणाली, ‘सुशांत याचा निधनाच्या 4 दिवसांपूर्वी काही वाईट होणार आहे असं वाटलं होतं.’ अभिनेत्याच्या मृत्यूच्या 4 दिवसांपूर्वी श्वेता यांनी सुशांत याला कॅलिफोर्निया येथे स्वतःकडे बोलावून घेतलं होतं. श्वेता हिने एक मेसेज करत अभिनेत्याला बोलावून घेतलं होतं. यावर सुशांत म्हणाला होता, ‘मलासुद्धा यायचं आहे दीदी…’ पण तेव्हा जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता(death).
सुशांत आणि श्वेता यांचे काही चॅट सध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहेत. अभिनेत्याची बहीण म्हणाली होती, ‘मला आजही पश्चाताप होत आहे.. मी त्याला काय झालं आहे सतत विचारलं असतं तर, आजचा दिवस वेगळा असता… सुशांत आज जिवंत असता. 12 जून रोजी सुशांत याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं. तो त्रासलेला होता.’ असं देखील अभिनेत्याची बहीण म्हणाली आहे.
सांगायचं झालं तर, श्वेता कायम अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर सुशांत याने इतकं मोठं पाऊल का उचललं? यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत सुशांत याच्या नावाची चर्चा रंगली. सुशांत याचं निधन झालं तेव्हा तो अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला डेट करत होता.
सुशांत याच्या निधनानंतर रिया हिला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. रिया आणि तिच्या भावाला सुशांत केस प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. सुशांत याच्या मृत्यू नंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
हेही वाचा :
बाळासाहेब आज असते तर धु धु धुतलं असतं; शिंदेंचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला
‘धर्मवीर’मधील राजन विचारेंचा ‘तो’ सीन खोटा; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता