Jio चा ‘हा’ प्लॅन घ्या, 90 दिवसांपर्यंत रोज फ्री 2GB डेटासह OTT चा आनंद घ्या

आज आम्ही तुम्हाला एका खास रिचार्ज प्लॅनची(plan) माहिती सांगणार आहोत. तुम्ही Jio चे युजर्स असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. Reliance Jio कंपनी तीन महिन्यांचा एक प्लॅन ऑफर करत आहे. तुम्हाला यात रोज फ्री 2GB डेटासह OTT चा देखील आनंद घेता येईल. चल तर मग जाणून घेऊया.

दरवाढीनंतर Reliance Jio ने आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक प्लॅन(plan) जोडले आहेत, जे इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूप फायदेशीर आहेत. Reliance Jio कंपनी तीन महिन्यांचे अनेक प्लॅन ऑफर करते जे चांगल्या इंटरनेट डेटासह आणि विनामूल्य अनेक फायदे देत आहेत.
ज्या ग्राहकांना दीर्घकालीन वैधता हवी आहे त्यांच्यासाठी Reliance Jio चे प्लॅन्स अतिशय किफायतशीर ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो दीर्घ वैधतेसह भरपूर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देतो.
Reliance Jio ने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी खास अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन आणला आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. MyJio App किंवा Jio Official Website वरून 899 रुपयांत खरेदी करता येईल. प्लॅनमध्ये युजर्सला 90 दिवस म्हणजेच पूर्ण 3 महिन्यांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सला रोज 2 GB हायस्पीड इंटरनेट मिळते. म्हणजेच 90 दिवसांसाठी Reliance Jio कंपनी 180 GB डेटाचा लाभ देत आहे. पण थांबा, डेटा तर त्याहूनही जास्त दिला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 20 GB डेटा फ्री मिळत आहे, ज्यामुळे एकूण डेटाचा फायदा 200 GB होतो. हा Reliance Jio प्लॅन इंटरनेट डेटाच्या बाबतीत मोठा फायदा मिळवून देतो.
याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग प्लॅनमुळे युजर यात अनलिमिटेड कॉल करू शकतो. यासोबतच रोज 100 SMS मोफत पाठवण्याचीही सुविधा आहे. डेटा कोटा संपल्यानंतरही इंटरनेट 64kbps च्या वेगाने सुरू राहणार आहे. एवढंच नाही तर या प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जात आहे. यासोबतच Jio App वरही मनोरंजनाचा आनंद लुटता येणार आहे.
या Jio प्लॅनसोबत JioTV, JioCloud App सब्सक्राईब केले जातात. JioTV वर टीव्ही शो वगैरेचा आनंद घेऊ शकता. प्लॅनसोबत येणारा JioCloud अॅप अॅक्सेस तुम्हाला एक्स्ट्रा स्टोरेज देतो. हा Jio चा प्लॅन ग्राहकांच्या प्रत्येक प्रकारच्या गरजा भागवणारे पॅकेज ऑफर करतो. यात डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एंटरटेनमेंटची सुविधा आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींनो, बॅंक बॅलेन्स तपासलात का? महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आलंय गिफ्ट!
नागरिकांनो काळजी घ्या, उष्णतेच्या लाटेचा इशारा, पारा चाळीशी गाठणार…
महाराष्ट्रासाठी Good News! 13 तासांचा प्रवास 5 तासात