कमी किंमतीत EV कार खरेदी करण्याची संधी!

जर तुम्ही एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकते. कंपनी या महिन्यात आपल्या ग्राहकांना कारवर चांगली सूट देत आहे. या महिन्यात टाटा टियागो इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही 85 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.

ही सूट कंपनी आपल्या लिमिटेड स्टोकवर देत आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही टाटा मोटर्स डीलरशीपशी संपर्क साधू शकता. Tiago ही आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मिनी कारपैकी एक इलेक्ट्रिक कार आहे. या कारची एक्स-शो रूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

फीचर्स आणि रेंज

Tiago EV मध्ये 19.2kWh आणि 24kWh चे दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. सिंगल चार्जिंगमध्ये याची ड्रायव्हिंग रेंज 250 किलोमीटर ते 315 किलोमीटर आहे, असा दावा कंपनीने केला आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये 2 एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

या कारला क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार NCAP रेटिंग मिळाली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Tiago EV मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. जी Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते आणि यात 4-स्पीकर देखील ग्राहकांना मिळणार.

Tata Punch EV वरही मिळत आहे मोठी सूट

तुम्ही या महिन्यात Tata Punch EV खरेदी केल्यास तुम्हाला 50,000 रुपयांची सूट मिळेल. ही सूट फक्त याच्या टॉप-स्पेक पंच EV Empowered + S LR AC फास्ट चार्जरवर उपलब्ध आहे. याची किंमत 10.98 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. म्हणजेच या महिन्यात तुम्ही ही कार खरेदी केल्यास तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येईल.