पंजाब नॅशनल बँकेने आपल्या बचत खातेदारांसाठी महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.(news)आता खात्यामध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. हा निर्णय १ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला आहे आणि तो विशेषतः महिला, शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांवर लक्ष केंद्रित करून घेतला गेला आहे.पीएनबीच्या या निर्णयामुळे बँकिंग सेवांपासून दूर असलेल्या वर्गाला आर्थिक समावेशाच्या प्रवाहात आणण्यास मोठी मदत होणार आहे. पूर्वी फक्त किमान शिल्लक न ठेवल्यामुळे अनेकांना दंड भरावा लागत असे, ज्यामुळे अनेक गरजू व्यक्ती बँकिंगपासून दूर राहत होते. आता मात्र हे चित्र बदलणार आहे.
पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक चंद्रा यांनी सांगितले की, “किमान शिल्लक रकमेची अट रद्द केल्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि अधिक लोक औपचारिक बँकिंग सेवांमध्ये सहभागी होतील.” बँकेचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत बँकिंगची पोहोच वाढवणे.(news)हा निर्णय केवळ दंड हटवण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण बँकिंग प्रणालीतील सर्वसमावेशकतेचा भाग आहे. यामुळे अल्प उत्पन्न गटातील नागरिक, महिलावर्ग आणि ग्रामीण भागातील लोक अधिक निर्भयतेने खात्यांचा वापर करतील, असा पीएनबीचा विश्वास आहे.
पीएनबीने अलीकडेच विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत शिक्षण कर्जाच्या व्याजदरात ०.२०% कपात केली आहे. आता शैक्षणिक कर्ज ७.५ टक्क्यांपासून सुरू होईल. हा निर्णय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी अधिक सक्षम बनवणारा आहे.विद्यालक्ष्मी योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने तयार करण्यात आलेली योजना आहे. पीएनबीने अशा योजनांमधून आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे, ज्याचा थेट फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.
काही आठवड्यांपूर्वीच कॅनरा बँकेनेही आपली किमान सरासरी शिल्लक ठेवण्याची अट रद्द केली होती.(news) कॅनरा ही अशा प्रकारचा निर्णय घेणारी पहिली सार्वजनिक बँक ठरली होती. त्या पावलावर पाऊल टाकत पीएनबीनेही आता खातेदारांच्या फायद्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.सध्या बँकिंग क्षेत्रात ग्राहककेंद्रित धोरणांना प्राधान्य दिलं जात आहे. या प्रकारच्या निर्णयांमुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, त्यांचं आर्थिक व्यवहारात अधिक सक्रीय सहभाग होईल आणि बँकिंग प्रणाली अधिक मजबूत होईल, असं मानलं जात आहे.
हेही वाचा :