कोल्हापूर : या 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल

यावेळी कसबा बावड्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. त्यातील किती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळणार याविषयी उत्सुकता आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर शहरासह तीन नगरपालिका, (candidate)दोन नगरपंचायती व जास्त मतदार संख्या असलेली ३४ गावे निर्णायक ठरणार आहेत. किंबहुना या ४० गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य त्याच उमेदवाराला विजयाचा गुलाल लागण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यात शहरातील कोल्हापूर दक्षिण व उत्तर, करवीर, कागल, चंदगड व राधानगरी-भुदरगड या मतदारसंघांचा समावेश आहे. कोल्हापूर (candidate)महापालिकेसह मुरगूड, कागल, गडहिंग्लज या तीन नगरपालिका, तर चंदगड व आजरा नगरपंचायतीचा या मतदारसंघात समावेश आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शहरी भागाने नेहमीच भाजप-सेना युतीला साथ दिल्याचा इतिहास आहे.

पण, यावेळच्‍या निवडणुकीत हे चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. त्यात या शहरातील नेते कोणाच्या बाजूला आहेत, त्यांनी आपल्या उमेदवारासाठी किती ‘फिल्डिंग’ लावली यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे. कोल्हापूर शहरात कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, सदर बाजार, विचारेमाळ, सिद्धार्थनगर, फुलेवाडी व पेठांच्या भागातील मतदारांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत (candidate)कसबा बावडा परिसरातून भाजप उमेदवाराने ३७ टक्के मते घेतली होती; पण कदमवाडी, भोसलेवाडी, सदरबाजार परिसरातील मतदार काँग्रेसच्या बाजूने राहिल्याचे चित्र होते.

यावेळी कसबा बावड्यात ७३ टक्के मतदान झाले आहे. त्यातील किती मते महायुतीच्या उमेदवाराला मिळणार याविषयी उत्सुकता आहे. गडहिंग्लज शहरावर जनता दल व राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रभाव आहे. जनता दलाने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्याचे प्रतिबिंब निकालात उमटू शकते. त्याचबरोबर गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांतील अप्पी पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या गटाचीही ताकद काँग्रेससोबत होती. करवीरमध्ये नगरपालिका किंवा नगरपंचायत नसली तरी वडणगे, प्रयाग चिखली, सांगरूळ, दक्षिण मतदारसंघातील गोकुळ शिरगाव, कळंबा, उचगाव, पाचगाव, गांधीनगर या मोठ्या गावांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे.

विधानसभा मतदारसंघातील मोठी गावे

  • करवीर – सांगरूळ, प्रयाग चिखली, वडणगे, सडोली खालसा, निगवे दुमाला
  • कोल्हापूर दक्षिण – कळंबा, पाचगाव, मुडशिंगी, गांधीनगर, उचगाव, गोकुळ शिरगाव
  • राधानगरी – भुदरगड – गारगोटी, मडिलगे बुद्रुक, कडगाव, वाघापूर, राशिवडे, कसबा वाळवे, कसबा तारळे, सरवडे, राधानगरी
  • चंदगड-गडहिंग्लज – नेसरी, हलकर्णी, भडगाव, महागाव, नूल, गिजवणे,
  • कागल – कसबा सांगाव, सेनापती कापशी, सिद्धनेर्ली, बिद्री, कापशी, चिखली, म्हाकवे, कापशी.

मतदारसंघातील शहरे

कोल्हापूर महापालिका, कागल, मुरगूड नगरपालिका, चंदगड, आजरा नगरपंचायत

हेही वाचा :

 प्रेमात अडसर ठरत होती बायको मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

अतिशय हुशार आणि मेहनती असतात या जन्मतारखेचे लोक

फक्त 11 रुपयांमध्ये करा सोन्याची खरेदी…