काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं; भरसभेतून PM मोदींची शरद पवार आणि ठाकरेंना ऑफर

नंदूरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरसभेतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये(political) विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये यावं. दोन्ही नेत्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेसोबत यावं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भरसभेतून खुली ऑफर दिली आहे. नरेंद्र मोदी हे नंदूरबारमधील प्रचारसभेत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर(political)काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता, असं वक्तव्य केलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांना मोठी ऑफर दिली आहे.

नंदूरबारमधील पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे
-जे लोक देश सोडून गेले आहेत. त्यांना रामाने सागंतिल्याप्रमाणे मातृभूमी गही स्वर्गावरून सुंदर आहे.

-काँग्रेस सत्तेत आल्यावर गरिबांना सतवलं गेलं. गरीब विरोधी मानसिकता असलेल्यांना माझ्या सारखा पंतप्रधान चालत नाही. नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करत आहेत. मला शिव्या देताना,व्होट बँकेला आवडेल अशी भाषा वापरतात.

-नकली शिवसेनावाले बॉम्बस्फोटातील दोषीला सोबत घेऊन फिरत आहेत. अशा पापींना सोबत घेऊन चालणाऱ्यांना लक्षात ठेवा. हे लोक जनतेची साथ विश्वास गमावून बसले आहेत.

-विरोधक विसरले आहेत की, देशातील नागरिक पंतप्रधान मोदींची रक्षा करतील. मातृशक्तीचा आशीर्वाद असल्याने मोदींना गाडू शकत नाहीत.

-बारामतीच्या निवडणुकीनंतर एक दिग्गज नेते चिंतेत आहेत. ते हताश आणि निराश झाले आहेत. त्यांनी सर्वांचा सल्ला घेऊनच वक्तव्य केले असेल.

-नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेनेने काँग्रेसमध्ये जाण्याचे मन बनवले आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावं.

हेही वाचा :

अतिशय हुशार आणि मेहनती असतात या जन्मतारखेचे लोक

 प्रेमात अडसर ठरत होती बायको मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

कोल्हापूर : या 40 गावांत ज्या उमेदवाराला मताधिक्य त्याच उमेदवाराला लागणार विजयाचा गुलाल