डस्टबिन घराच्या या दिशेला अजिबात ठेवू नये , कुटुंबातील व्यक्तींवर वाढतो कर्जाचा बोजा
घरात कोणती वस्तू कुठे असली पाहिजे याबाबत वास्तूशास्त्रात (architecture)बरीच माहिती दिली गेली आहे. लोकं असे मानतात की, वास्तूशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार जर आपण वस्तू त्या जागा ठेवल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. घरात कचऱ्याचा डब्बा कोणत्या दिशेला असावा याबाबत देखील अनेकांना शंका आहे. जाणून घेऊयात
वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू असावी याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. जे लोकं वास्तुशास्त्र मानतात त्यांच्या घरात या गोष्टी पाहायला मिळतात. घर सुंदर दिसावं यासाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात. पण त्या कोणत्या दिशेला असायला हव्यात याबाबत वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. सजावटीची वस्तू असो किंवा दैनंदिन वापरातील वस्तू असो. ती योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात समस्या निर्माण होत नाहीत. घरातील कचऱ्याचा डब्बा कुठे असावा याबाबत देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे.
कचऱ्याचा डब्बा जर योग्य दिशेला ठेवला नाही तर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. याशिवाय घराचे सौंदर्यही बिघडते. त्यामुळे डस्टबिन ठेवताना काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान टाळता येईल. तुमच्या घराचा लूक देखील खराब होणार नाही. डस्टबिन ठेवण्याची योग्य जागा कोणती आहे जाणून घेऊयात.
ईशान्य दिशा ही जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असते. डस्टबिन जर तुम्ही या दिशेला ठेवली तर नकारात्मक ऊर्जा इतकी वाढते की घरातील लोकांमध्ये विनाकारण निराशा पसरते. यामुळे घरातील व्यक्तींचा विकास थांबतो. नोकरी आणि करिअरच्या चांगल्या संधी कमी होऊ शकतात. एवढेच नाही तर या ठिकाणी डस्टबिन ठेवल्याने घरही चांगले दिसत नाही.
घराच्या आग्नेय दिशेला जर डस्टबिन ठेवत असाल तर यामुळे बचत कधीच होत नाही. यामुळे घरात ठेवलेली सर्व बचत आणि पैसाही हळूहळू संपुष्टात येऊ लागतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा बोजा वाढू शकतो. घर सजवताना देखील या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. या दिशेला डस्टबिन येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
पूर्व दिशा भगवान सूर्याद्वारे दर्शविली जाते. त्यामुळे या दिशेला डस्टबिन अजिबात ठेवू नका. असं केल्यास घरातील लोकांमध्ये तणाव वाढू लागतो. कुटुंबातील सदस्यांना एकटे वाटू लागते. प्रत्येक कामात यामुळे अडथळे येऊ लागतात. या ठिकाणी डस्टबिन ठेवल्याने घराचे सौंदर्यही बिघडते.
बरीच लोकं हे घराच्या बाहेर कचऱ्याचा डब्बा ठेवतात. पण असे करू नये. कारण सगळ्यात आधी कोणी तुमच्या घरी आला तर त्याची नजर डस्टबिनवर पडेल. याशिवाय परंपरेनुसार डस्टबिन हा घरातच असला पाहिजे. यासाठी घराची नैऋत्य दिशा आणि उत्तर-पश्चिम दिशा योग्य मानली जाते.
हेही वाचा :
कोल्हापूर:फुटबॉल पंढरी’त 25 एकरांत साकारणार आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदान
इचलकरंजी: कुख्यात एस.टी. सरकार गॅंगवर माेठी कारवाई
शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा लागेल; कोणत्या महामार्गाबाबत बोलले मुश्रीफ?