‘खेळ सुरु राहिला हवा…’ भारत – पाकिस्तान मॅच खेळवण्याबाबत सौरव गांगुलीने घेतली भूमिका

आशिया कप 2025 मध्ये भारत – पाकिस्तान हे संघ क्रिकेट सामना खेळणार आहेत. याबाबत भारतीय क्रिकेट (cricket)चाहत्यांनी बीसीसीआयवर संताप व्यक्त केलाय. मात्र असं असताना माजी कर्णधार सौरव गांगुलीने सामना खेळवला जावा याच्या बाजूने भूमिका घेतलीये.

आशिया कप 2025 ही स्पर्धा यंदा यूएईमध्ये 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. शनिवारी उशिरा या स्पर्धेचं(cricket) वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. आशिया कप 2025 मध्ये ग्रुप स्टेज सामन्यांकरता भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय. 14 सप्टेंबर रोजी भारत – पाकिस्तान दरम्यान ग्रुप स्टेज सामना खेळवला जाईल. मात्र भारत – पाकिस्तान सामना खेळवण्याबाबत भारतीय क्रिकेट फॅन्समध्ये नाराजीचं वातावरण आहे. पाकिस्तान देश नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देतो आणि याच कारणामुळे भारताने या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध कोणताही सामना खेळू नये असा असं मतं चाहते व्यक्त करतायत. असं असतानाच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने याबाबत त्याची भूमिका मांडली आहे.

काय म्हणाला सौरव गांगुली?
आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तान विरुद्ध सामना खेळू नये अशी मागणी भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून केली जातेय. यावर बोलताना माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, ‘मला हे चालणार आहे. खेळ सुरूच राहायला पाहिजे. त्याचवेळी पहलगाम सारखी घटना पुन्हा होऊ नये हे देखील तितकंच खरं. पण खेळ सुरूच राहिला पाहिजे. भारताने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतलीये, त्यामुळे खेळ खेळला गेला पाहिजे’.

आशिया कप 2025 स्पर्धा कुठे खेळवली जाणार?
आशिया कप 2025 ही स्पर्धा यंदा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या पाश्ववभूमीवर संघांचा (cricket)सराव व्हावा या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया कप 2025 चे आयोजन यंदा भारताकडे आहे, असं असलं तरी स्पर्धेचे सर्व सामने हे संयुक्त अरब अमीरातमध्ये खेळले जातील. आशिया कप 2025 मध्ये यंदा एकूण 8 संघ सहभागी होणार असून यात भारत, अफगानिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, हॉन्ग-कॉन्ग, ओमान आणि यूएई इत्यादींचा सहभाग आहे. 8 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए – भारत, पाकिस्तान, यूएई, ओमन तर ग्रुप बी – बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, हॉंगकॉंग.

आशिया कप 2025 मध्ये भारताचे सामने कधी?
ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा 10 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये होईल. तर दुसरा सामना हा 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये होईल. भारताचा तिसरा ग्रुप स्टेज सामना हा 19 सप्टेंबर रोजी ओमानमध्ये होईल.

भारत – पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी :
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात पाकिस्तानमधून ट्रेनिंग घेतलेल्या काही दहशतवाद्यांनी 26 निष्पाप भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या नंतर संपूर्ण देश शोक सागरात बुडालं आणि पाकिस्तान विरुद्धचा राग भारतीयांच्या मनात आणखीनच वाढला. यानंतर कोणत्याही क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी मागणी होत होती. मात्र आशिया कप 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामन्याचा वेळापत्रक जाहीर केल्याने लोकांमध्ये आक्रोश वाढला आहे.

हेही वाचा :