रात्रीत खेळ चालणार, भाजपा डाव पलटणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडली. मागील दोन दिवसांपासून (hours)महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी लगभग सुरू आहे. महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण असेल ? याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 48 तासात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण ?  ते ठरणार अशा चर्चा होत्या.

मात्र 48 तास उलटून गेले तरी मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरूच आहे. त्यात एक नवीन माहिती समोर येत आहे. आज रात्रीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.मुख्यमंत्री भाजपाचाच राहील हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना पूर्वी असलेली खाती आणि उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीत भाजपाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे बहुमत असल्याने भाजपाकडे (hours)मुख्यमंत्री पद यायला हवं असे भाजपाच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांनाच वाटत होते. त्यामुळे मुख्यमंत्री पद हे भाजपाच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे.

सहा आमदारांमागे एक मंत्री पद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेत भाजपाचे 132 उमेदवार निवडून आल्याने भाजपाच्या 22 हून अधिक आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या 9 पेक्षा अधिक आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 5 हून अधिक आमदारांना मंत्रिपद मिळतील अशी सूत्रांनी दिलेली माहिती आहे.  भाजपाचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर(hours) बावनकुळे हे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून निवडून आले आहेत. कामठी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्याची शक्यता आहे

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा

डॉक्टरांनी सुचवलेली 7 जादुई फळं फक्त 20 रुपयांत हाडांना बनवा लोखंडासारखी मजबूत