Aadhar Card वापरकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर!
आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं(news) कागदपत्र आहे. आधार कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा देखील आहे. यासोबतच खाते उघडण्यापासून ते जमीन आणि घर खरेदीपर्यंत सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर आवश्यक आहे. मात्र तुमच्या आधार कार्डचे तपशील अपडेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करुन दिले जात होते, मात्र आता पुढील काही दिवस तुम्ही आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करु शकता.
UIDAI ने 10 वर्षांपूर्वी केलेले आधार कार्ड मोफत अपडेट(news) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याची अंतिम मुदत देखील पुन्हा वाढवण्यात आली आहे. आता 14 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही हे काम मोफत करु शकता. ही डेडलाइन आज संपत होती. मात्र, अणखी तीन महिन्यांसाठी अथाॅरिटीने आधार कार्ड अपडेटचा निर्णय घेतला आहे. याआधी देखील फ्री मध्ये हे काम करण्याची लास्ट डेट अनेकदा वाढवण्यात आली होती.
दरम्यान, मार्चमध्ये ही सेवा मोफत वापरण्याची अंतिम तारीख 14 मार्च ते 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा डेडलाइन वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली. आता पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी डेडलाइन वाढवण्यात आली आहे. युजर्स 14 डिसेंबरपर्यंत फ्री मध्ये हे काम करु शकतात. UIDAI ने सोशल मीडियावर ही माहिती दिली व एक्स हँडलवर पोस्ट केलीये.
आधार कार्ड फ्री मध्ये अपडेट करण्याची मुदत संपल्यानंतर अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI द्वारा निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल. हा खर्च 50 रुपये आहे. यूआयडीएआय द्वारा देण्यात येणारी आधार कार्ड अपडेट करण्याची ही फ्री सर्विस केवळ myAadhaar Portal वर उपलब्ध आहे.
हेही वाचा:
कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न, कमी दरात कांदा विक्री सुरु
देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट!
गणपती बाप्पांना अटक करायचं काम काँग्रेसनं केलंय; मुख्यमंत्री शिंदेंचा संताप