महायुतीतील ‘राष्ट्रवादी’ जागा निश्चित करत सुटली; भाजप आणि शिवसेना ‘टेन्शन’मध्ये…
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुतीकडून पहिल्या जागेवर(determined meaning) दावा निश्चित केला आहे. जागावाटपावेळी जिथे महायुतीचा उमेदवार नसेल तिथे राष्ट्रवादी दावा करणार आहे. जागा वाटपाअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यास सुरवात झाली आहे. यामुळे जागावाटपाचा महायुतीत तिढा वाढणार आहे.
प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे(determined meaning) यांनी श्रीरामपूर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राहून राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार असल्याचे सांगितले. सुनील तटकरे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट टेन्शनमध्ये आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची श्रीरामपूर येथे आढावा बैठक झाली. तत्पूर्वी राहुरी विधानसभा मतदारसंघाची देखील आढावा घेतला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अनुराधा नागवडे, आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, बाळासाहेब पवार, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब जगताप, कपिल पवार उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा गैरसमज 2016 च्या पालिका निवडणुकीत अनुराधा आदिक यांनी दूर केला. अविनाश आदिक यांनी अजित पवार यांना साथ देताना पक्षासाठी राष्ट्रीय तसेच राज्याच्या राजकारणात योगदानाची आम्ही दखल घेतली. योग्यवेळी त्यांच्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी म्हटले.
नगराध्यक्ष पदाच्या काळात अनुराधा आदिक यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. त्यामुळे विधानसभेला याठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार असला तर, निश्चितपणे निवडून येईल. येथे अनेक प्रश्न असून ते सोडवण्यासाठी अविनाश आदिक यांनी श्रीरामपूरमध्ये थांबलं पाहिजे, असे सांगून विधानसभेची तयारीचे सूचक संकेत सुनील तटकरे यांनी आदिक यांना दिले.
अविनाश आदिक यांनी देखील श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादीलाच सुटली पाहिजे अशी कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा आहे. हा मतदार संघ आरक्षित असला तरी, पक्षाचा आमदार निवडून आणू शकू एवढी ताकद आपल्याकडे असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
लागोपाठ शतकांसह स्म्रिती मंधानाने रचला इतिहास!
अभिनेत्री प्रियंका चोप्राचा एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात
महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना 5 लाखांपर्यंतचे उपचार फ्री; CM शिंदेंची घोषणा