राहुल गांधींनी केला भाजपवर मोठा आरोप…

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदीराच्या उद्घाटनात येऊ दिलं नाही. कारण त्या आदिवासी आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. भंडारा येथे आज राहुल गांधी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा आरोप केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ”राम मंदिराच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना आत जाऊ दिलं नाही, त्यावेळी मीडियाने काहीच म्हटलं नाही. तिथे अदानी बसले होते, अंबानी यांच्यासह बॉलीवूडचे सगळे स्टार तिथे उपस्थित होते. क्रिकेटरही बसले होते. मात्र थिटे एकही मागासवर्गीय, दलित किंवा आदिवासी नव्हता.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, ”काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत मी यात्रा केली. शेतकरी, मजूर यावेळी मी अनेकांना भटलो. सगळ्यांना मी विचारलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे, ते म्हणाले, बेरोजगारी, महागाई, शेतमालाला भाव, हे मुद्दे आहेत. मात्र तुम्ही टीव्ही पाहिला तर तुम्हाला बेरोजगारी, महागाई हे मुद्दे दिसणार नाही. तुम्हाला तिथे फक्त बॉलीवूड स्टार, क्रिकेटर आणि पंतप्रधान मोदी दिसतील.”

‘अग्नीवीर योजना बंद करणार’

ते पुढे म्हणाले, ”आम्ही सत्तेत आल्यावर अग्नीवर ही योजना बंद करू.” राहुल गांधी म्हणाले, ”30 लाख सरकारी जागा आहेत,10 वर्षात मोदींनी त्या भरली नाही. आम्ही सत्तेत आल्यास 30 लाख नोकऱ्या देऊ.”

भाजपवर आरोप करत राहुल गांधी म्हणाले आहेत की, देशातील 22 लोकांकडे देशातील 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे. ते (पंतप्रधान मोदी) 24 तास त्या 22 लोकांना मदत करत असतात. बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे.