वडापाव देण्याच्या बहाण्याने तरुणीला घरी नेले, महिलेच्या पतीने

ओळखीच्या असलेल्या महिलेने एका 19 वर्षाच्या मुलीला वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी (husband)नेले. तरुणीला घरात सोडून महिला बाहेर गेली असता महिलेच्या पतीने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार बुधवारी दि. 3 दुपारी दोन ते रात्री साडे अकराच्या दरम्यान कात्रज परिसरात घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पीडित 19 वर्षाच्या मुलीने शुक्रवारी दि.5 भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रल्हाद सखाराम साळुंके वय -48 रा. कात्रज व त्याच्या पत्नीवर वय-45 आयपीसी 376, 376/2/एन, 342, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बुधवारी (husband)दुपारी दोनच्या सुमारास भाजी मंडई येथे पायी चालत जात होती. त्यावेळी तिच्या ओळखीची आरोपी महिला भेटली. महिलेने तरुणीला गोड बोलून तिच्या राहत्या घरी घेऊन गेली. तरुणीला वडापाव देण्याचा बहाणा करुन तिला एकटीला घरात ठेवून बाहेर निघून गेली.
महिलेने घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली.
तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून महिलेच्या पतीने तिच्यासोबत (husband)जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
पतीच्या या कृत्याला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.

हेही वाचा :

साक्षात देव आला तरी संजय मंडलिकांचा पराभव होऊ शकत नाही; हसन मुश्रीफांना कोल्हापुरात दांडगा काॅफिडन्स

जयंत पाटलांकडून टीकास्त्र; देवेद्र फडणवीसांकडून मोठा गौप्यस्फोट

सांगलीच्या जागेचा तिढा दिल्ली दरबारी