जोपर्यंत मरत नाही, तोपर्यंत मारत… कोयता नाचवत रील बनवली, पोलिसांनी दट्ट्या देताच हिरोगिरी…

पोलिसांचा दट्ट्या पडल्यानंतर या स्वयंघोषित गँगस्टरने व्हिडीओच्या माध्यमातून आपली चूक कबूल केली. एवढंच नव्हे तर त्याने पोलिसांची हात जोडून माफी देखील मागितली.

सोशल मीडियावर हिरोगिरी करणाऱ्या हुश्शार लोकांची काही कमी नाही… मात्र पोलिसांनी दट्ट्या दाखवताच ते पुन्हा लाईनीवर(death)येतात. पुण्यामागोमाग आता सोलापुरातही अशा बहाद्दराला पोलिसांनी अटक केली आहे. कोयता हातात घेऊन रील बनवणं त्या माणसाला चांगलंच महागात पडलंय. सोलापुरातील कोयता गँगस्टर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात दहशत माजवणाऱ्या व्यक्तीचं रील व्हायरल होताच पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली. पोलिसांचा दट्ट्या बसताच त्या स्वयंघोषित गँगस्टरने व्हिडीओच्या माध्यमातून आपली चूक कबूल केली. एवढंच नव्हे तर हात जोडून पोलिसांची माफी देखील मागितली.

सोशल माध्यमातून अनेक प्रकारचे व्हिडिओ माध्यमांमध्ये पाहायला मिळतात. सोलापुरातील एका स्वयंघोषित कोयता गँगस्टरने हातात कोयता घेऊन रील तयार केलं. तो व्हिडीओ (death)सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. हातात कोयता घेऊन रील बनवणं गँगस्टरला महागात पडलं.

विजय माने असं कोयता हातात घेऊन रील बनवणाऱ्या या आरोपीचं नाव आहे. ‘ जो पर्यंत मरत नाही, तो पर्यंत मारत राहावं, मेलं तर मारत राहावं,एक घाव दोन तुकडे, केली तर दुष्मनी कट्टर करा’ असं म्हणत आरोपी विजयने हातात कोयता घेऊन एक रील बनवलं होतं. एवढंच नव्हे तर त्याने हे रील बनवून त्याने व्हॉट्सॲपवर शेअरही केलं.(death) मात्र त्याचं हे रील व्हायरलं झालं. सोलापूर पोलिसांच्या हाती हा व्हिडिओ लागल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी विजय माने याला ताब्यात घेतलं. पोलिसांचा दट्टा बसला आणि तो गँगस्टर ताळ्यावर आला. कारवाई नंतर माने याने पोलिसांची हात जोडून माफी मागीतली आहे. याप्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या रीलमध्ये वापरण्यात आलेला कोयता देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा :

ओबीसी उमेदवार देण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरांनीच अखेर यू-टर्न घेतला!

सलग ३ पराभवानंतर MIच्या कर्णधाराला आठवला ‘भोलेनाथ’; हार्दिकने महादेवाला घातलं दुग्धाभिषेक

धक्कादायक! ऑन ड्यूटी पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या