… म्हणून अंगाला काय भोकं पडत नाहीत; अजितदादा सुप्रियाताईंना असं का म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अशातच अवघ्या महाराष्ट्राचं(political) लक्ष हे बारामतीच्या राजकारणाकडे असतं. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला होता. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्त्युतर दिलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज होमग्राऊंड म्हणजेच बारामतीमध्ये(political) जनसन्मान यात्रेनिमित्त लाडक्या बहिणींशी संवाद साधला आहे. यावेळी अजित पवारांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेतला अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मी सकाळी लवकर उठतो, या अजित दादांच्या भाषणातील वाक्यावरुन त्यांनी दादांवर खोचक शब्दात टीका केली होती.
मात्र आज अजित पवार यांनी बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधला, त्यावेळी अजितदादांनी नाव घेता खासदार सु्प्रिया सुळेंना टोला लगावला आहे. काहीजण म्हणतात दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंना प्रत्त्युतर दिलं आहे.
जनसन्मान यात्रेनिमित्त अजितदादा पुढे म्हणाले की, आपण विकासकामांच्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे. कारण बारामतीमधील विकासकामे आणि सरकारी योजनांचा लाभ यांसंदर्भाने भाषण करत सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेवरही अजित पवारांनी चांगलाच पलटवार केला आहे.
राजकीय टीका व टिपण्णी टाळून आपण केवळ विकासावरच बोलायला हवं. मात्र काहीजण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का?, असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे.
हेही वाचा:
गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात जाणार का? म्हणाली…
मी कधीच भाजपमध्ये जाणार नाही!; रवी राणांनी बावनकुळेंची ॲाफर धुडकावली
नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; मुस्लिम समाज आक्रमक