या ५ चुकांमुळे होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन

मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपचा(whatsapp business apk)जगभरात कोट्यावधी लोक वापर करतात. ज्यामुळे आपल्याला अनेक लोकांशी कनेक्ट होता येते. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे.

एखादी छोटीशी चूक केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप(whatsapp business apk) अंकाउटही बॅन होऊ शकते. अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचे उल्लंघन होते. त्यानंतर लगेच आपले व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होते.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे कंपनी गोपनीयता आणि सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी करत नाही. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुम्ही सावधगिरीने त्याचा वापर करायला हवा. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होऊ शकते.

या ५ चुकांमुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होईल

-तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर जीबी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप प्लस आणि व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा यांसारख्या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

-एखाद्या नंबरच्या माहितीसह व्हॉट्सअॅप अकाउंट तयार केल्यास कंपनी कारवाई करु शकते. अशा व्हॉट्सअ‍ॅप अंकाउट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली जाऊ शकते.

-जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करणे आहे.

-जर काही लोकांनी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिपोर्ट केले किंवा ब्लॉक केले असेल तर तुमचे खाते बंद होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अशा खातींना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.

-तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणालाही बेकायदेशीर संदेश, अश्लील मेसेज किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. कंपनीच्या नियमांविरुद्ध तुम्ही काही चुकीचे केले तर नंबरही बॅन होऊ शकतो.

जर तुम्हाला वाटत असेल की, व्हॉट्सअ‍ॅप ने तुमचे खाते चुकीच्या कारणांमुळे बॅन केले आहे तर ते सक्रिय करण्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट अ रिव्ह्यू पर्यायावर टॅप करावे लागेल. व्हॉट्सअ‍ॅप तुमची रिक्वेस्ट तपासून योग्य ती कारवाई करेल. त्यानंतर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते पुन्हा सुरु होईल.

हेही वाचा :

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय!

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं थैमान!

विधानसभेत काँग्रेस- ठाकरे गट वेगळे लढणार, प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत