महिलांना सर्वाधिक आकर्षित करतात नवऱ्याच्या ‘या’ सवयी; उत्तम जोडीदार ठरायचंय तर जाणून घ्या

लग्न झाल्यावर सुरुवातीचे दिवस खूप खास मानले जातात. यामध्ये प्रेम, काळजी, (habits )एकमेकांसाठी वेळ, सगळं अगदी सुंदर या गोष्टी असतात. मात्र आजकाल जसजसा काळ पुढे जातो, तसतसं रोजच्या जबाबदाऱ्या, ऑफिसचं प्रेशर, घरगुती गोष्टी यामध्ये नवरा-बायकोचं नातं थोडंसं कोरडं पडतं. अशामध्ये प्रेम उरतं पण ते व्यक्त करायला वेळ किंवा सवड राहत नाही.पण जर एका पुरुषाला एक चांगला नवरा व्हायचंय? तर त्यासाठी ना महागड्या गिफ्ट्सची गरज आहे, ना मोठ्या सरप्रायझेसची… गरज आहे फक्त समजूतदारपणाची, आदराची आणि सवयी बदलण्याची. आज आम्ही तुम्हाला अशा सवयींबाबत सांगणार आहोत ज्या बायकोला प्रचंड आवडतात.

नात्याची सुरुवात ‘मित्रत्वा’पासून करा
महिलांना चांगला पती तोच वाटतो जो आपल्या पत्नीला आधी ‘मैत्रीण’ मानतो. (habits )जर पत्नी तुम्हाला तिच्या सगळ्या गोष्टी सहजपणे सांगू शकत असेल, तर ती स्वतःला तुमच्याशी खूप जवळचं आणि सुरक्षित समजेल. नात्यात मैत्री असेल, तर भांडणं कमी होतील आणि समजूत वाढेल.लग्नानंतर बऱ्याचदा पुरुष स्वतःकडे लक्ष देणं थांबवतात. यावेळी कुठेही बाहेर जाताना न विंचरलेले केस, पोट वाढलेलं, कपड्यांकडे दुर्लक्ष या गोष्टी हमखास होतात. मात्र पुरुषांनी असं करणं टाळावं. जेव्हा तुम्ही स्वतःला व्यवस्थित ठेवता, फिट आणि छान दिसता, तेव्हा तुमच्या पत्नीला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो.

पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष द्या
सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे ऐकणं. बऱ्याच पुरुषांना वाटतं की मी ऐकत असतो, (habits )पण खरं ऐकणं म्हणजे फक्त डोकं हलवणं नाही. तुमच्या पत्नीचं बोलणं लक्षपूर्वक ऐका, तिला समजून घ्या. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होतं.

पत्नीच्या चुका समजून घ्या
आजच्या काळात कोणीही परफेक्ट नसतं. तुमचंही काहीतरी चुकतं, त्याचप्रमाणे तुमच्या पत्नीचंही काहीतरी चुकचत असेल. त्यामुळे तिच्या एखाद्या सवयीने त्रास झाला तरी चिडू नका, खेकसू नका, यावेळी तुम्ही तिला प्रेमाने सांगा. त्याच वेळी, तिच्या चांगल्या गोष्टींचं कौतुकही जरूर करा. कारण प्रेम हे उणिवांसह स्वीकारण्यात असतं.

हेही वाचा :