इराण-इस्रायलच्या युद्दात ‘या’ कंपन्या तुम्हाला करणार मालामाल

इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. इराणने काही दिवसांपूर्वी इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागली आहेत. परिणामी इस्रायलनेही हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासाठी आपल्या कारवाईला गती दिली आहे. परिणामी इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात उघड-उघड युद्धजन्य(war) स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही क्षणी या युद्धाचा भडका उडू शकतो. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे.

भारतीय शेअर बाजारात सध्या अस्थिरता निर्माण झाली आहे. या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी यांच्यात साधारण 4-4 टक्क्यांची घसरण झाली आहे. इराण आणि इस्रायल यांत्यातील युद्धामुले(war) तेलाचा भाव चांगलाच भडकला आहे. अशा स्थितीत खालील पाच तेल कंपन्यांत गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.

शेअर बाजारातील तज्ज्ञांनुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील स्थितीमुळे तेलनिर्मितीशी निगडीत कंपन्यांच्या शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. आखाती देशातील स्थिती पुन्हा एकदा पुर्वपदावर आल्यानंतर तेलनिर्मितीशी निगडीत असलेल्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा पूर्वस्थितीत येऊ शकतात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय निवडून तेलनिर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांत गुंतवणूक करता येऊ शकते. सोमवारी (7 ऑक्टोबर) या कंपन्यांवर नजर ठेवता येईल.

1) गंधार ऑइल रिफायनरी
ब्रोकरेज हाउस VLa Ambala च्या म्हणण्यानुसार हा स्टॉक सध्या अंडरव्हॅल्यू आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार या स्टॉकला 210 रुपये ते 215 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकतात. हा स्टॉक खरेदी केल्यास 228 रुपये, 235 रुपये आणि 250 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. गुंतवणूकदार एक आठवडा ते आठ आठवड्यापर्यंत या स्टॉकला होल्ड करू शकतात. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करत असाल तर स्टॉपलॉस 200 रुपये ठेवायला हवा.

2- ऑइल इंडिया लिमिटेड
SS WealthStreet संस्थेच्या संस्थापक सुगंधा यांच्या म्हणण्यानुसार, “ऑइल इंडिया या कंपनीने आतापर्यंत 135 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. सध्या या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण जाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार 510 रुपयांच्या मूल्यावर या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यासाठी 665 रुपये ते 680 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे.

3- पेट्रोनेट एलएनजी
VLA Ambala च्या रिपो४टनुसार पेट्रोनेल एलएनजी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. 340 रुपये ते 350 रुपयांच्या रेंजमध्ये हा स्टॉक खरेदी करता येईल. ब्रोकरेज हाऊसने या स्टॉकसाठी 370 रुपये ते 430 रुपयांचे टार्गेट सुचवले आहे. तर 310 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा, असे या ब्रोकरेज हाऊसने म्हटले आहे.

4- BPCL
बीपीसीएल या कंपनीच्या शेअरचे मूल्य सध्या 340 रुपये आहेच. या कंपनीचा शेअर 290 रुपये ते 310 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करायला हवा. तसेच 365 रुपये ते 450 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवायला हवी. त्यासाठी स्टॉपलॉस हा 265 रुपये असावा.

5- ONGC
VLA Ambala ब्रोकरेज फर्मनुसार या शेअरमध्ये 276 रुपये ते 255 रुपयांपर्यंत खरेदी करावे. या कंपनीत गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी 310 रुपये ते 370 रुपये टार्गेट ठेवायला हवे. तर स्टॉपलॉस हा 240 रुपये ठेवावा.

(टीप– शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

टाटा मोटर्सने टाटा पंचची स्‍पेशल ‘कॅमो’ एडिशन केली लाँच

रोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर…; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित

बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला