हा खेळाडू UNSOLD ठरूनही आयपीएल खेळणार
अजिंक्य रहाणेचे नाव जेव्हा आयपीएलच्या लिलावात पुकारले गेले तेव्हा त्याच्यावर (auction sites)कोणीही बोली लावली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणे अनसोल्ड ठरला होता. पण त्यानंतरही अजिंक्यला आपल्या संघात स्थान देण्याचा निर्णय आता एका संघाने घेतला आहे. अजिंक्यसाठी मुंबई इंडियन्स किंवा चेन्नई सुपर किंग्स पुढे आली नसून एका मोठ्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
अजिंक्य रहाणे गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्सच्या संघात होता. अजिंक्यने गेल्यावर्षी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी अजिंक्यला चेन्नईचा संघ आपल्या ताफ्यात पुन्हा एकदा घेईल, असे वाटले होते. पण अजिंक्यचे नाव लिलावात आले तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्याच्यावर बोली लावली नाही, त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अजिंक्यवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणे अनसोल्ड ठरला होता. पण अनसोल्ड ठरूनही अजिंक्यला आयपीएलच्या लिलावात लॉटरी लागल्याचे पाहायला मिळाले. कारण एका संघाने आता अजिंक्यला आयपीएल खेळण्याची संधी दिलेली आहे.
अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंची नावं पुन्हा एकदा लिलावात घेण्यात आली. त्यावेळी मुंबई इंडियन्स अजिंक्यला आपल्या ताफ्यात घेईल, असे सर्वांना वाटत होते. कारण अजिंक्य हा मुंबईच्या(auction sites)संघाचा रणजी स्पर्धेसाठी कर्णधार आहे. पण मुंबईने त्याच्यासाठी जास्त रस दाखवला नाही. त्यामुळे अजिंक्य यावेळी अनसोल्ड ठरणार, असे सर्वांना वाटत होते. पण त्याचवेळी एक संघ अजिंक्यच्या मदतीसाठी धावून आला. अजिंक्य रहाणेची बेस प्राइज १.५० कोटी रुपये ठेवण्यात आली होती. त्यामुळे या बेस प्राईजवर त्याला संघात स्थान दिले ते केकेआरने. त्यामुळे आता अजिंक्य रहाणे हा आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.
अजिंक्य रहाणे सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात नसल्याचे म्हटले जात आहे. पण अजिंक्य आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करतो, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे (auction sites)आता अजिंक्य पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
हेही वाचा :
आज उत्पत्ती एकादशीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ!
MS धोनीचा खास भिडू मुंबई इंडियन्सने हिसकावला
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा
मोठी बातमी! पंतप्रधानांविरुद्ध अटक वॉरंट जारी; नेमकं कारण काय?
रेल्वे पटरीवर बाईक घसरली थोडक्यात अनर्थ टळला थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
जाणून घ्या: कोणत्या देशात भाताचा सर्वाधिक खप होतो आणि का?