राज्यात तीन दिवस पावसाचा तडाखा; शनिवारपासून धो धो बरसणार

राज्यातील जनतेची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. राज्यात गेल्या (weather station)तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून राज्यात पाऊस धो धो बरसणार आहे. मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आता मान्सूनचं राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी मोसमी पाऊस(weather station) तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मॉन्सून गोव्यातच अडखळला आहे. आज तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत सध्या घाटकोपर ते मुलुंड दरम्यान पाऊस सुरू आहे.

पावसासाठी पोषक वातावरण

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 4 जून रोजी मोसमी (weather station) पाऊस गोव्यात दाखल झाला. त्याने पुढची कुच सुरु केली आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल. तर 10 जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्यात पाऊस मांडव घालेल. शनिवारपासून राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडेल. पुढील काही दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाचा जोर राहणार आहे.

हेही वाचा :

पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण

टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी

मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार