आजपासून TRAI चे नवीन नियम लागू, टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीला बसणार आळा

आजपासून भारतीय टेलिकॉम कंपन्यांना(companies) भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचे नवीन नियम सर्व टेलिकॉम लागू करण्यात आले आहेत. आता रिलायन्स जिओ, एअरटेल, आणि VI सारख्या सर्व मोठ्या कंपन्यांवर या नवीन नियमांचा प्रभाव पडणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना आता अधिक चांगल्या सेवांचा लाभ मिळेल. यामुळे कॉल ड्रॉप्स, सेवा खंडित होणे, आणि स्पॅम कॉल्स सारख्या समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात TRAI ने ग्राहकांच्या हितासाठी कोणते नियम लागू केले आहेत.

TRAI ने भारतीय कंपन्यांना(companies) ग्राहकांच्या सेवा सुधारण्यासाठी काही स्पष्ट सुचना दिल्या आहेत. जवळपास दहावर्णानंतर TRAI ने सेवांच्या गुणवत्तेत काही महत्तवपूर्ण बदल केले आहेत. TRAI ने ग्राहकतांना उत्तम नेटवर्क आणि कमी कॉल ड्रॉप्समध्ये सुधारणा करण्यास सांगितले आहे. कोणत्याही भागात 24 तासांपेक्षा जास्त काळ सेवा खंडित झाल्यास, त्या टेलिकॉम कंपनीवर दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे कंपन्यांना त्यांच्या सेवा सतत कार्यक्षम ठेवण्याची जबाबदारी अधिक कठोरपणे पार पाडावी लागेल.

आजपासून प्रत्येक टेलिकॉम कंपनीला आपल्या वेबसाइटवर त्यांच्या सेवा उपलब्धतेची माहिती देणे TRAI ने बंधनकारक केले आहे. कोणत्या क्षेत्रात कोणती सेवा उपलब्ध आहे, याची माहिती ग्राहकांना वेबसाइटवरून सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहक त्यांच्या सोईनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्वोत्तम नेटवर्क निवडू शकतील. याआधी या माहितीच्या अभावामुळे ग्राहकांना चांगल्या नेटवर्कसाठी संघर्ष करावा लागत होता.

अलीकडे स्पॅम कॉल ही एक मोठी समस्या बनलेली आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र TRAI च्या नव्या नियमांमुळे ग्राहकांना आता स्पॅम कॉलबद्दल काळजी करण्याची गरज नाही. नवीन नियमांनुसार 1 ऑक्टोबरपासून स्पॅम कॉल्सवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण येईल. नियम न पाळल्यास टेलिकॉम कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे स्पॅम कॉल्स आणि अनावश्यक मार्केटिंग कॉल्सपासून ग्राहकांना मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.

TRAI च्या या नवीन नियमांमुळे ग्राहकांना सेवा गुणवत्तेत मोठा बदल दिसेल. यासोबतच टेलिकॉम कंपन्यांनाही त्यांच्या सेवा सुधारण्याचा दबाव असेल, ज्याचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार आहे.

हेही वाचा :

किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत

iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट

राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल