T-20 वर्ल्डकप स्पर्धेचा बिगुल वाजला !
वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा २०२७ च्या सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात रंगणार आहे. आता या स्पर्धेतील सामन्यांच्या ठिकाणांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या मैदानांवर रंगणार सामने…
या स्पर्धेतील सामने जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियातील सेंच्युरियन पार्क, डर्बनच्या किंग्समीड, सेंट जॉर्ज, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मांगुआंग ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे CEO फोलेत्सी मोसेकी याबाबत बोलताना म्हणाले की, ‘ हा निर्णय हॉटेल रुम्स आणि एयरपोर्टची सुविधा हे सर्व पाहता घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीचे मान्यताप्राप्त ११ स्टेडियम्स आहेत. त्यामुळे उर्वरित ३ स्टेडियम्सकडे दुर्लक्ष करणं कठिण होतं. मात्र हा निर्णय अनेक बाबींचा विचार करुन घेण्यात आला आहे.’
ज्या देशाकडे स्पर्धेचे यजमानपद असते. तो संघ थेट या स्पर्धेसाठी पात्र ठरतो. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेचा संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे. हे दोन संघ थेट पात्र ठरले असले तरीदेखील नामिबीया संघाला पात्रता फेरीतील सामने खेळून या स्पर्धेत प्रवेश करावा लागणार आहे. यासह जे संघ आयसीसीच्या रँकिंगमध्ये टॉप ८ मध्ये असतील, त्या संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. तर उर्वरित ४ संघ पात्रता फेरीतून प्रवेश करणार आहेत.