नवीन संविधानासाठी हवेत दोन तृतियांश खासदार! भाजप खासदार थांबेनात, पुन्हा वादग्रस्त विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपुर्वीच एका प्रचारसभेत भारतीय(political marketing) संविधानाबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर परत आले तर ते संविधान बदलू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. पण आज आंबडेकर जयंतीदिनीच भाजप नेत्याच्या संविधान बदलण्याबाबतच्या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. संविधानात बदल करण्यासाठी किंवा नवीन संविधानासाठी दोन तृतीयांश खासदार हवे असल्याचे विधान या नेत्याने केलं आहे.

उत्तर प्रदेशातील फैजाबादचे खासदार आणि भाजपचे(political marketing) उमेदवार लल्लू सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांचा याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विरोधकांनीही एक्स हँडलवर हा व्हिडीओ शेअर करत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे.

लल्लू सिंह यांनी म्हटले आहे की, ‘सरकार तर 272 खासदारांनीच बनते, पण 272 चे सरकार संविधानात बदल करू शकत नाही. संविधानात बदल करण्यासाठी किंवा नवीन संविधानासाठी दोन तृतियांश जागांची गरज असते.’ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे विधान आल्याने भाजपची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे.

सिंह यांचा हा व्हिडीओ एक्स हँडलवर पोस्ट करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपला जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्यासाठी विजय हवा आहे. भाजप आरक्षण आणि संविधान संपवू इच्छित आहे. त्यामुळे जनता त्यांचा पराभव करेल.

काँग्रेसकडूनही भाजवर टीका करण्यात आली आहे. पक्षाचे नेते पवन खेडा म्हणाले, मोदींनी म्हटले होते की आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत. आता अयोध्येतील भाजपचे विद्यमान खासदार उघडपणे संविधान बदलण्यासाठी 400 जागा जिंकायला हव्यात, असे बोलत आहेत. मोदी यांना मनापासून माफ करू शकतील?, असा सवालही खेडा यांनी केला आहे.

संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजपचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट पक्षाने कापले आहे. त्यांनीही संविधान बदलण्यासाठी 400 पार खासदार हवे असल्याचे विधान केले होते. पक्षाने त्यांना नोटीसही पाठवली होती. त्यानंतर तिकीट कापून इतर नेत्यांना सुचक संदेशही दिला. पण त्यानंतरही भाजप नेत्यांकडून संविधान बदलण्याबाबतची वक्तव्यं केली जात आहेत.

हेही वाचा :

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

‘सलमान खान यह तो ट्रेलर है…’; अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी, फेसबुक Post Viral

‘धोनी त्याला ‘CSK ची कतरिना कैफ’ म्हणतो’; पत्नीनेच केला रंजक खुलासा! Video पाहाच