नवी मुंबई : वाशी सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही आग सोसायटीच्या(society) 10, 11 आणि 12 व्या मजल्यावर वेगाने पसरली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एका वृद्ध आजींसह एकाच कुटुंबातील आई-वडील आणि सहा वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. मृतांमध्ये पूजा राजन (40), सुंदर बाळकृष्ण (42) आणि त्यांची मुलगी वेदिका (6) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहाव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेचा आणि बाराव्या मजल्यावरील कुटुंबातील तिघांचा गुदमरून किंवा भाजून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाशी अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी रात्रभर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत चार निर्दोष जीव या आगीत करपले होते.ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कोणत्या कारणामुळे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. वाशी पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून सखोल तपास सुरू आहे.या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात (society)हळहळ आणि शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरातील रहिवासी आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
मुलीच्या जन्मानंतरची पहिल्यांदाच सिद्धार्थ – कियाराने साजरी केली दिवाळी..
लाल-हिरव्या मिरच्यांपासून तयार केली दिवाळीची लायटिंग…पाहाल तर थक्क व्हाल; Video Viral
35 वर्षांची वहिनी 19 वर्षाच्या दीराच्या प्रेमात,मग जंगलात जाऊन तिथे…