केळी हे वर्षभर बाजारात सहज उपलब्ध असलेले आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असलेले फळ आहे.(bananas ) ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. पण जेव्हा आपण केळी घरी आणतो तेव्हा एक दिवसानंतर त्याची साल काळी पडू लागते आणि केळी खराब होऊ लागते. विशेषतः उन्हाळ्यात एक दिवसानंतर केळी लगेच खराब होऊ लागतात. त्यामुळे लोकं केळी खरेदी करण्यास किंवा ते लवकर खाण्याचा प्रयत्न करण्यास टाळाटाळ करतात.पण तुम्ही जर केळी योग्य पद्धतीने ठेवली तर ती 1-2 दिवसांनीही केळी ताजी राहतील. यासाठी तुम्हाला त्या योग्य पद्धती माहित असणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला केळी जास्त दिवस ताजी ठेवण्याचे मार्ग सांगणार आहोत, जे तुमच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील आणि केळी लवकर खराब होण्याची तुमची समस्या देखील दूर होईल
1. केळी वेगळी ठेवा.
बऱ्याचदा लोकं केळी घड खरेदी करतात आणि तसेच आणून घरात ठेवतात, पण असे केल्याने ती लवकर पिकतात आणि खराब होतात. यासाठी केळी वेगवेगळी करून ठेवा. जेणेकरून इथिलीन वायूचा जो पिकण्याची प्रक्रिया वेगवान करतो परिणाम कमी होईल. यामुळे केळी लवकर खराब होणार नाहीत.
2. केळी फ्रीजमध्ये ठेवा पण असे
पिकलेली केळी फ्रिजमध्ये ठेवणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु लक्षात ठेवा की केळीची साल काळी पडली तरी आतील फळ सुरक्षित आणि खाण्यायोग्य राहील. (bananas )केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होत नाहीत आणि त्यांचे शेल्फ लाइफ वाढते.
3. केळीचे देठ फॉइल किंवा प्लास्टिकने गुंडाळा
केळीच्या देठामधून बहुतेक इथिलीन वायू बाहेर पडतो. जर तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीने किंवा अॅल्युमिनियम फॉइलने गुंडाळले तर हा वायू बाहेर पडणार नाही आणि केळी जास्त दिवस ताजी राहतील.
4. केळी हुक किंवा स्टँडवर ठेवा
तुम्ही केळीचा घड हुक किंवा स्टँडवर टांगू शकता. अशा प्रकारे ते जमिनीच्या संपर्कात येत नाहीत आणि ते लवकर काळे होत नाहीत. यामुळे तुम्ही केळी बराच दिवस ताजी ठेवू शकता आणि खाऊ शकता.
5. केळी सोलून फ्रिजमध्ये ठेवा
पिकलेली केळी सोलून त्यांचे तुकडे करा आणि फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. ही केळी नंतर स्मूदी, आईस्क्रीम बेस किंवा बेकिंगसाठी वापरता येतील.
केळीचे पोषण आणि फायदे
हेल्थलाइनच्या मते, केळी हे कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅटेचिन आणि प्रतिरोधक स्टार्च सारखे पोषक घटक देखील असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. (bananas )केळीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. केळी सेवन हृदय आणि पचनासाठी फायदेशीर आहे.
हेही वाचा :