वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!
महाराष्ट्रात आज कोणत्या भागात उकाडा कायम असेल आणि कुठे पावसाच्या सरी कोसळणार?(weather) हे जाणून घेऊयात. महाराष्ट्रात अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी उकाडा मात्र कायम आहे. शनिवारी राज्यात धुळे आणि जळगावमध्ये सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, बऱ्याच ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. यातच विदर्भ आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. हवामानविभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे वादळी पावसाची शक्यता आहे.
अंदमानात आज मान्सून दाखल होणार
दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर आज मान्सून(weather) दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये येत्या ३१ मे रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी नोंदवलेले तापमान
पुणे (३६.६ अंश सेल्सिअस), धुळे (४२ अंश सेल्सिअस), जळगाव (४२ अंश सेल्सिअस), कोल्हापूर३५.६ अंश सेल्सिअस), महाबळेश्वर (२८.६ अंश सेल्सिअस), मालेगाव (४०.२ अंश सेल्सिअस), नाशिक (३८.२ अंश सेल्सिअस), निफाड (३८.३ अंश सेल्सिअस), सागली (३५.४ अंश सेल्सिअस), सातारा (३६.९ अंश सेल्सिअस), सोलापूर (३७.६ अंश सेल्सिअस), साताक्रूझ (३६ अंश सेल्सिअस), डहाणू (३७ अंश सेल्सिअस), रत्नागिरी ३४.४ (अंश सेल्सिअस), छत्रपती सभाजीनगर (३८ अंश सेल्सिअस), बीड (३७.५ अंश सेल्सिअस), परभणी (३४.३ अंश सेल्सिअस),(weather) अकोला (४०.२ अंश सेल्सिअस), अमरावती (३७ अंश सेल्सिअस), बुलडाणा (३७.६ अंश सेल्सिअस), ब्रह्मपुरी (३७.२ अंश सेल्सिअस), चंद्रपूर (३६ अंश सेल्सिअस), गडचिरोली (३५ अंश सेल्सिअस), गोंदिया (३२.४ अंश सेल्सिअस), नागपूर (३४. १ अंश सेल्सिअस), वर्धा (३७.४ अंश सेल्सिअस), वाशीम (३१.२ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (४० अंश सेल्सिअस).
हेही वाचा :
12 महिन्यांनंतर शुक्र स्वगृही, ‘या’ राशींचं नशीब चमकणार
आज मोहिनी एकादशीला ‘या’ राशींची होणार लखलखाट
सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा