“आम्ही धर्मयुद्ध लढत बसू अन् तिकडे अमृता फडणवीस रील बनवत..”; ‘या’ नेत्याचा टोला

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात(political news) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रफुल्ल गुडधे यांच्या प्रचारासाठी नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कन्हैया कुमार हे नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीसांनी धर्मयुद्धावरुन केलेल्या वक्तव्याचा कन्हैया यांनी समाचार घेतला. आम्ही धर्म वाचवत बसू आणि तुमची बायको इन्स्टाग्रामवर रील बनवत असेल, असा सणसणीत टोला त्यांनी अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या लगावला आहे. कन्हैया यांचं हे विधान आता चर्चेत आलंय.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे(political news)मुख्यमंत्री नाहीत, तर बेईमान गुजराती नेत्यांचे चौकीदार असल्याचं देखील कन्हैया कुमार म्हणाले. फडणवीस म्हणाले की, हे धर्मयुद्ध आहे. तुमच्या समोर जो नेता धर्म वाचवण्याचं भाषण झाडत असेल, त्याला तुम्ही एकच गोष्ट विचारायची आहे. धर्म वाचवण्याच्या या लढाईत तुमचा मुलगा किंवा मुलगी पण आमच्यासोबत असणार ना?, असा खोचक सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केलाय.

“धर्म वाचवण्याची जबाबदारी आमची आणि ऑक्सफर्ड केंब्रिजमध्ये शिकण्याची जबाबदारी तुमच्या मुला बाळांची, असं तर होणार नाही ना? धर्म वाचवायचाच असेल, तर सगळे मिळून वाचवुयात. नाहीतर आम्ही धर्म वाचवत बसू आणि उपमुख्यमंत्र्यांची बायको इन्स्टाग्रामवर रील बनवत बसेल, असं तर नाही ना होणार?”, असा टोला कन्हैया कुमार यांनी आपल्या भाषणातून लगावला आहे.

दरम्यान, प्रफुल्ल गुडधे यांच्यानंतर धारावी विधानसभेच्या काँग्रेस उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारसभेत देखील कन्हैया कुमार यांनी जोरदार भाषण करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ईव्हीएम हॅकिंगबद्दल लोकं बोलतात, पण महाराष्ट्रात तर मुख्यमंत्रीच हॅक केला आहे. धारावीकरांना बेघर करु पाहणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर द्या आणि मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकवा, असं आवाहन कन्हैया कुमार यांनी केलंय.

दरम्यान, अमृता फडणवीस या सोशल मीडियावर कायम अॅक्टिव राहत असतात. त्यांच्या अनेक रीलही अधूनमधून येत असतात. गायनसोबत त्या रील देखील बनवत असतात. यावरूनच कन्हैया कुमार यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना टार्गेट केलं आहे. आता या टीकेला देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, त्याकडे सर्वांच्या नजरा असतील.

हेही वाचा :

ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन

“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं

सोन्याचे दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी