“फोटोंना काय जोडे मारता, हिम्मत असेल तर समोर येऊन..”; अजित पवारांचं थेट आव्हान
26 ऑगस्टरोजी सिंधुदुर्गमधील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (political)पुतळा कोसळल्याची घटना घडली. यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली. याविरोधात महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधत याचा निषेध केला. मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. त्यात मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
या ‘जोडे मारो’ आंदोलनावरून आता अजित पवार(political) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट आव्हानच दिलं आहे. “हा रडीचा डाव कशाला खेळता?, हिम्मत असेल तर समोरासमोर या ना, दोन हात करू.”, असं अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती येथे जन सन्मान यात्रेत अजित पवार बोलत होते.
“या घटनेत राजकारण आणण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच दैवत आहेत. या प्रकरणात ज्यांची चूक झाली त्याला शोधून काढले जाईल. पण असं राजकारण कुणी करू नये.”, असंही अजित पवार म्हणाले.
एखाद्या महापुरुषाचा पुतळा आपल्या काळात उभारलेला असताना तो पडावा असं कुठल्या सरकारला वाटेल? कुणालाच वाटणार नाही, पण त्यात राजकारण, वेगवेगळ्या टीकाटिप्पणी, आम्हीही मूक आंदोलन केले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देत याचा तपास करावा अशी मागणी केली, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“अहमदपूर सभेत मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागितली. या घटनेत ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू. कोणाची तरी चूक असेल त्याला शोधायचे, त्याला शासन करायचे आणि पुन्हा तिथे महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक उभारायचे. मी स्वत: तिथे बांधकामाची बारकाईनं पाहणी केली आहे. त्यामुळे राजकारण करू नका.”, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, अजित पवारांच्या आव्हानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:चं कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करून पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये. जे चोरी करून राजकारणात आले आहेत मग ते मिंधे असतील नाहीतर अजित दादा असतील, त्यांच्या तोंडात अशी मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा:
20 वर्षांच्या प्रसिद्ध स्टारचा अश्लील डीपफेक व्हिडीओ व्हायरल
प्रिया बापटचे बोल्ड सीन्स, रितेश देशमुखचा नवा अंदाज… टीझरवर प्रेक्षकांच्या उड्या
सरकार या क्षेत्राला देणार तब्बल 80,000 कोटी रुपये; देशात होणार डिजीटल क्रांती!