काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे

अनेक व्यक्ती सर्वांसमोर रडत नाहीत. किंवा शक्यतो वाईट वाटल्यवर रडणे(crying) टाळतात. रडल्याने डोकं दुखतं तसेच रडणारी व्यक्ती कमजोर आहे असं म्हटलं जातं. मात्र खरंतर रडण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे आज या बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

ताण कमी होतो
आपण जेव्हा रडतो(crying) तेव्हा आपल्या डोक्यात फार ताण असतो. राडल्याने डोक्यावरील ताण कमी होतो. कारण आपल्या अश्रुंमध्ये कोट्रिसोल असते. रडत असताना स्ट्रेस हार्मोन्स देखील बाहेर पडतात आणि डोकं शांत होतं. मन काही प्रमाणात हलकं होतं.

वजन कमी होते
आपण एखाद्या गोष्टीमुळे उदास असतो किंवा नाराज असतो तेव्हा आपण रडतो. तसेच अशावेळी आपल्याला भूक देखील लागत नाही. त्यामुळे रडत असताना आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात. तसेच आपल्याला भूक लागत नाही. त्यामुे वजनही कमी होतं.

डोळे स्वच्छ होतात
अनेकदा रस्त्याने जाताना आपल्या डोळ्यांमध्ये घान आणि कचरा साचतो. अशावेळी डोळे फार चुरचुरतात. त्यावेळी डोळ्यातून पाणी येणे गरजेचं असतं. आपण रडल्यानंतर आश्रुंच्या सहाय्याने डोळ्यातील कचरा देखील बाहेर पडतो. त्याने डोळे स्वच्छ होतात.

वेदना कमी होतात
लहान मुलं किंवा मोठ्या व्यक्ती देखील खाली पडल्या की त्यांना दुखापत होते. किंवा अन्य कोणत्या गोष्टीने मार लागला असेल तेव्हा आपोआप आपण रडू लागतो. अश्रूंमध्ये ओक्सिटोसीन असते. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या वेदना रडल्यानंतर काही प्रमाणात कमी होतात.

मूड बदलतो
रडणे म्हणजे राग व्यक्त करणे देखील असते. अनेकदा ज्या व्यक्तींना एखाद्या गोष्टीचा भयंकर राग येतो चिढ येते मात्र ते हतबल असल्याने काही करू शकत नाहीत. अशावेळी त्या व्यक्ती रडतात. म्हणजे अश्रुंच्या साहाय्याने ते आपला राग व्यक्त करत असतात.

हेही वाचा :

 ‘नाच गं घुमा’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! ‘या’ राशींना मिळणार चौफेर लाभ